फोटोग्राफी

Top 5: बॉलीवुड गाणी गाणारे हे गायक घेतात सर्वात जास्त मानधन

जाणून घेऊया सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांची नावं.

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच गाण्यांनाही महत्व आहे.गाणी बघून अनेकदा प्रेक्षक चित्रपट बघायचा की नाही ते ठरवतात.चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना हसायला,रडायला आणि आनंद व्यक्त करायला लावतात.एकंदरीत कुठल्याही चित्रपटात गाण्याची भूमिका फार महत्वाची ठरते.आणि गाण्यांत तो जोश आणि उत्साह आणतात ते गायक.जाणून घेऊया सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांची नावं.

श्रेया घोषाल ही गायिका सगळ्यात महागडी गायिका समजली जाते.तिच्या प्रत्येक गाण्याचे मानधन ती २५-२७ लाखाच्या घरात घेते.श्रेयाच्या गाण्यांचा चाहता वर्गही फार मोठा आहे.
यो यो हनी सिंगच्या गाण्याचाही बॉ़लीवुडमधे एक खास चाहता वर्ग आहे.एक गाणं गाण्याचे हनी सिंग २०-२२ लाख एवढे मानधन घेतो.हनी सिंगचे गाणे तरूणांना जास्त आवडतात.त्याच्या लाईव्ह शो ला देखिल तरूणांची दाट गर्दी तुम्हाला बघायला मिळेल.
मिका सिंगच्या गाण्यांची बॉलीवुडमधे एक खास ओळख आहे.मिका सिंग एका गाण्याचे मानधन २०-२२ लाखांच्या घरात घेतो.
अरिजित सिंगचा 'मेलोडी गाण्यांचा अल्बम' असो किंवा मग त्याचे 'रोमँटिक साँग',त्याच्या गाण्यांचे चाहते देश विदेशात आहेत.अरिजित सिंग एक गाणं गाण्याचे १८-२० लाख एवढं मानधन घेतो.
'इंडियन आयडल'च्या मंचावरून गाण्याच्या करियरला सुरूवात करणारी नेहा कक्कर चाहत्यांची आवडती आहे.बॉलीवुडमधे स्वत:च्या गाण्यांनी वेगळी ओळख निर्माण करणारी नेहा एक गाणं गाण्यासाठी अंदाजे १५-१८ लाखाच्या घरात मानधन घेते.
सुनिधी चव्हाण हीने अनेक सुपरहिट गाणे म्हटले आहेत.सुनिधी प्रत्येक गाण्यामागे १२-१६ लाख एवढे मानधन घेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT