Congress flag esakal
जळगाव

Congress Lok Sabha Election: कॉंग्रेसतर्फे रावेरमधून 3, जळगावमधून 5 इच्छुक! लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी तयारी

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेसतर्फे लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेसतर्फे लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.

पक्षाने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघातील इच्छुकांची नावे मागविली आहेत, जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघात तीन तर जळगाव मतदार संघात चार उमेदवार इच्छुक असल्याचे सांगण्यात आले आहेत. (3 aspirants from Raver 5 from Jalgaon Preparation for both Lok Sabha seats congress political news)

कॉंग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत राज्यात लोकसभेच्या निवडणूका लढणार आहेत. तीन पक्षाचे जागा वाटप लवकरच होणार आहे.

मात्र तरीही कॉंग्रेस पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातील इच्छुकांची नावे मागविली आहेत. जिल्हाध्यक्षांनी दहा जानेवारीपर्यंत ही नावे मुंबई येथे प्रदेशाध्यक्षाकडे सूपूर्द करावयाची होती. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव असे दोन लोकसभा मतदार संघ आहेत.

या दोन्ही मतदार संघातील इच्छुकांची नावे जिल्हाध्यक्षांनी दहा जानेवारीपर्यंत मागविली होती. त्यानुसार त्यांच्याकडे ही नावे प्राप्त झाली आहेत. प्रदेशाध्यक्ष प्रदीप पवार यांनी नावे मुंबई येथे प्रदेशाध्यक्षाकडे सूपूर्द केल्याचे सांगण्यात आले.

रावेर मधून तीन जण इच्छुक

रावेर लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसतर्फे तीन जण इच्छुक असल्याचे सांगण्यात आले आहे. यात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, रावेर येथील आमदार शिरीष चौधरी व माजी जिल्हाध्यक्ष चोपडा येथील ॲड.संदीप पाटील यांची तयारी असल्याचे सांगण्यात आले

जळगावमधून चार इच्छुक

जळगाव लोकसभा मतदार संघातून चार जण इच्छुक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र त्यापेक्षा अधिक जण असल्याचेही सांगण्यात आले आहे.

यात विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चाळीसगाव येथील सुलोचना वाघ, ओबीसी आघाडीचे अमळनेर येथील डी.डी.पाटील व माजी जिल्हाध्यक्ष ॲड.सलीम पटेल यांची नावे असल्याचे सांगण्यात आले.

सर्वेत कॉंग्रेसला कल

जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले कि, जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघाचा आम्ही सर्वे केला होता. त्यात कॉंग्रेसकडे जनतेचा अधिक कल असल्याचे दिसून आले त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीत दोन्ही मतदार संघ आपल्याकडेच घ्यावे असे वरीष्ठांना सूचविले आहे.

त्यामुळे त्या दृष्टीने वरिष्ठस्तरावर विचार करण्यात येत असून महाविकास आघाडीत या दोन्ही जागा कॉंग्रेसकडेच असतील असा दावाही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: सायलीच तन्वी असल्याचं उघड होणार ? नव्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्साह; "आता मालिका योग्य ट्रॅकवर"

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

SCROLL FOR NEXT