7 lakhs lost were online with lure of multiple profit jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : मोठ्या नफ्याच्या आमिषाने गमावलेत तब्बल 7 लाख

मोबाईलवर लिंक पाठवून त्याद्वारे दिलेला टास्क पूर्ण केल्यास त्या बदल्यात अनेक पटीत नफा देण्याच्या आमिषाने शोएब खान रऊफ खान (३७, रा. खडका रोड, भुसावळ) या तरुणाची ६ लाख ९१ हजार ७८ रुपयांना ऑनलाइन फसवणूक झाली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मोबाईलवर लिंक पाठवून त्याद्वारे दिलेला टास्क पूर्ण केल्यास त्या बदल्यात अनेक पटीत नफा देण्याच्या आमिषाने शोएब खान रऊफ खान (३७, रा. खडका रोड, भुसावळ) या तरुणाची ६ लाख ९१ हजार ७८ रुपयांना ऑनलाइन फसवणूक झाली. (7 lakhs lost were online with lure of multiple profit jalgaon crime news)

यामध्ये खान यांच्यासह त्यांच्या आई व पत्नी यांच्या खात्यावरूनही रक्कम लंपास झाली आहे. याप्रकऱणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथील व्यापारी शोएब खान यांना १७ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान अशाच एका सायबर भामट्याने संपर्क साधत सोशल मीडियावर लिंक पाठवून टास्क दिला.

तो पूर्ण केल्यास त्या बदल्यात अधिक नफा देऊ, असे त्यांना सांगण्यात आले.

त्या आमिषाला बळी पडून खान यांच्यासह त्यांच्या आई व पत्नीच्या बँक खात्यातून संबंधिताने वेळोवेळी एकूण ६ लाख ९१ हजार ७८ रुपये काढले.

त्या बदल्यात नफा तर दूरच हातची रक्कम गेली व कोणताच मोबदला मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर खान यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT