Asha group promoters protesting in front of the collector's office. esakal
जळगाव

Jalgaon News : आशा, गटप्रवर्तक संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

आशा, गटप्रवर्तकांना २ हजार रुपये भाऊबीज दिले जाईल, या आश्वासनानुसार शासकीय परिपत्रक न काढल्यामुळे १२ जानेवारीपासून राज्यातील साठ हजार आशा वर्कर व गटप्रवर्तक संपावर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आशा, गटप्रवर्तकांना २ हजार रुपये भाऊबीज दिले जाईल, या आश्वासनानुसार शासकीय परिपत्रक न काढल्यामुळे १२ जानेवारीपासून राज्यातील साठ हजार आशा वर्कर व गटप्रवर्तक संपावर आहेत.

संपाला अकरा दिवस झाले तरीसुद्धा सरकारने या संपाची दखल घेतलेली नाही. (Asha group promoters protest in front of collectors office jalgaon news)

म्हणून सरकारने आशा, गटप्रवर्तक यांना दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय जी.आर. काढावा व संप मिटवावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता.२३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक संघटनेने निदर्शने केली.

जळगाव जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक यांनी धरणे आंदोलन केले. कामगार नेते अमृत महाजन, मिनाक्षी सोनवणे, गटप्रवर्तक संघटनेच्या अध्यक्ष सुनीता ठाकरे यांनी नेतृत्व केले. आंदोलनात भुसावळ, चोपडा, जळगाव, यावल.

धरणगाव, चाळीसगाव तालुक्यांतील दोनशे आशा व गटप्रवर्तक यांनी सहभाग घेतला. आठ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनांमध्ये वाढ देण्यासह जीएस वाय लाभार्थ्यांना ए.पी.एल., बी.पी.एल.भेद केला जाणार नाही, असे आश्‍वासन दिले होते.

गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचारी म्हणून महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार होते. तेही शासनाने केले नाही म्हणून आंदोलन सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT