crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दुचाकीवर लिफ्ट न दिल्याने चाकूने हल्ला

दुचाकीवर लिफ्ट न दिल्याने चाकूने हल्लाशहरातील आंबेडकर नगरात बुधवार (ता.२०) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीस्वारावर धारदार चाकूने हल्ला चढवून ठार मारण्याचा प्रयत्न झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : दुचाकीवर लिफ्ट न दिल्याने चाकूने हल्लाशहरातील आंबेडकर नगरात बुधवार (ता.२०) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीस्वारावर धारदार चाकूने हल्ला चढवून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. (Attacked with knife for not giving lift to bike jalgaon crime news)

जखमी महेंद्र ऊर्फ मनोज नवल राठोड (वय २७) याच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जुने जळगाव, आंबेडकर नगरातील रहिवासी महेंद्र ऊर्फ मनोज नवल राठोड (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे बुधवार(ता.२०) रोजी रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना त्यांना विक्की ज्ञानेश्वर माळी (वय १८, रा. जानकी नगर) याने लिफ्ट मागितली, मात्र महेंद्र राठोड यांनी वाहन न थांबवता निघून गेल्याने त्याचा राग येऊन विक्की ज्ञानेश्वर माळी याने महेंद्र राठोड यांचे वाहन थांबवून शिवीगाळ दमदाटी करत चाकूने हल्लाकरुन जखमी केले.

जखमींच्या जबाबावरून शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक योगेश जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT