crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : वाणेगाव (ता. पाचोरा) येथील अल्पवयीन मुलीवर गावातीलच ३१ वर्षीय युवकाने घरात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

मुलीने आरडाओरड केल्याने युवकाने तिला सोडून दिले. (Attempted physical abuse on minor girl jalgaon crime news)

याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून युवकाला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगी अंगणात खेळत असताना अमोल नामक युवकाने आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने तिला घरात बोलवले.

तिच्या अंगावरून हात फिरवत तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला असता, तिने आरडाओरड केली. तेव्हा त्याने ‘कोणाला सांगितले तर तुझे तुकडे करून फेकून देईन’ असा दम देऊन सोडून दिले. अशी तक्रार पीडीत मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिल्यावरून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा नोंदवून अमोल नामक युवकाला अटक केली आहे.

त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात; चार वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT