brother hit brother on head with pavadi Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : घर नावावर का करत नाही म्हणत सख्ख्या भावानेच भावाच्या डोक्यात मारली पावडी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : घर नावावर करत नाही म्हणून सख्ख्या भावाने डोक्यात पावडी मारून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तालुक्यातील म्हसले येथे घडली. (brother hit brother on head with pavadi Jalgaon Crime News)

सुकलाल चुडामन पाटील हे शनिवारी (ता. २९) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घरी टीव्ही बघत असताना लहान भाऊ जयवंत चुडामन पाटील घरात आला आणि त्याने अचानक कानफटात मारून आईच्या साड्या बाहेर का पडल्या आहेत म्हणत भांडण सुरू केले.

माझे घर नावावर का करत नाही, असे म्हणून शिवीगाळ करू लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

थोड्यावेळाने भाऊ जयवंत व पुतण्या दोघेही परत घरी आले आणि पुतण्याने मागून पकडून ठेवून भावाने डोक्यावर पावडीने वार केला. त्यामुळे सुकलाल गंभीर जखमी झाला.

उपचारासाठी नर्मदा फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले. संदेश पाटील व सुनील जाधव या पोलिसांनी दवाखान्यात येऊन जबाब घेतल्यावर अमळनेर पोलिस ठाण्यात जयवंत पाटील व अजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

Thane News: डोंबिवली सर्पदंश प्रकरण; डॉ. संजय जाधव निलंबित, पालिका आयुक्तांकडून मोठी कारवाई

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Kannad Accident : तेलवाडीजवळ दुचाकीला पिकअपचा अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : मंचर येथून परांडा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी किराणा साहित्याचे दोन ट्रक रवाना

SCROLL FOR NEXT