crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : महिलेचा जळून मृत्यू चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मांडळ (ता. अमळनेर) येथे ३१ वर्षीय महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ होत असल्याने छळाला कंटाळून महिलेने स्वतःला जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथे ३१ वर्षीय महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ होत असल्याने छळाला कंटाळून महिलेने स्वतःला जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case has been registered against four persons for burning death of woman jalgaon crime news)

मांडळ येथील आशा स्वयंसेविका म्हणून काम करणाऱ्या अश्विनी अरुण पाटील (वय ३१) यांच्या घराजवळ राहणाऱ्या दत्तात्रय पाटील, चंद्रभागा पाटील, विठोबा पाटील व कीर्ती पाटील यांनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

त्याचा त्यांना मनस्ताप झाल्याने शुक्रवारी (ता. १२) अश्‍विनी पाटील यांनी राहत्या घरात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला जाळून घेतले.

त्यात त्या सत्तर टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू असताना बुधवारी (ता. १७) त्यांचा मृत्यू झाला.

महिलेचा भाऊ हितेंद्र निकम यांच्या फिर्यादीवरून वरील चारही जणांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT