जळगाव

बोगस ज्वारी बियाण्याच्या प्रश्नावर आमदारांनी घेतली कृषिमंत्र्यांची भेट

आनंन शिंपी

चाळीसगाव ः बोगस बियाण्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी कृषिमंत्री दादा भुसे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, तसेच अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्रसिंह यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 


संबंधित हायटेक कंपनीच्या ३२०६ या ज्वारी वाणाच्या कणसांना दाणेच न आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, कंपनीवर गुन्हा दाखल करावा व शेतकऱ्यांच्या झालेल्या कोट्यवधींच्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली. या वेळी माजी आमदार तथा कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, भाजपचे शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ उपस्थित होते. कृषिमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ राज्याचे गुणनियंत्रक संचालकांना चौकशीचे आदेश देऊन संबंधित कंपनीवर कारवाईचे निर्देश दिले.

कृषी मंंत्र्याकडे धाव..

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनीदेखील या प्रकरणात स्वतः वैयक्तिक लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केवळ सहानुभूती न दाखविता, शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने शेतकऱ्यांना फसविणाऱ्या बोगस बियाणे कंपनीविरोधात थेट मंत्रालयाचा दरवाजा आमदार मंगेश चव्हाण यांनी ठोठावल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनोळखी नंबर लगेच ओळखता येणार! १ नोव्हेंबरपासून नवा नियम लागू; आता लपवालपवी थांबणार

Farming Success Story : पावसाने खरीप वाया गेला, कोथिंबिरीने तारले! सादीक सय्यद यांना अडीच एकरांसाठी पाच लाखांची बोली

Latest Marathi News Update : एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, भाडेवाढ होणार नाही; परिवहन मंत्र्यांची माहिती

Matheran Mini Train: दसऱ्याच्या मुहूर्तावर धावणार 'माथेरानची राणी'! मिनी ट्रेन सेवा २० ऑक्टोबरपासून सुरू; पर्यटकांना दिलासा

Shukra Asta 2026 Effects on Zodiac Signs : शुक्राचा अस्त ठरणार त्रासदायक! पुढील 14 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांनी राहावे सावध; होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT