crime  
जळगाव

रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यालगत अनोळखी तरुणाचा खून

दिलीप वैद्य

रावेर :  येथील बऱ्हाणपूर रस्त्यालगत असलेल्या गोवर्धन नगर या एकही घर नसलेल्या भागात २६ ते २८ वय असलेल्या युवकाचा खून झाल्याचे आढळून आले आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील बऱ्हाणपूर रस्त्याला लागून असलेल्या शिवप्रसाद नगरच्या मागे गट नंबर ४८९ मध्ये गोवर्धन नगर आहे. येथील भूखंड विकले गेले असले तरी या भागात एकही घर अद्याप बांधले गेलेले नाही. रावेर बऱ्हाणपूर रस्त्यापासून सुमारे दोनशे मीटर आत असलेल्या या भागात आज सकाळी एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असता तो खून असल्याचे निष्पन्न झाले. खून झालेला युवक २६ ते २८ वर्षाचा तरुण आहे. त्याच्या शर्टवर रिलायन्स टेलर, पैठण रोड, औरंगाबाद असा पत्ता आहे.

युवकाचा चेहरा रक्ताळलेला असून त्याचा खून होण्यापूर्वी परिसरात झटापट झाली असावी असा पोलिसांचा कयास आहे. त्याच्या शर्टच्या गुंड्या तुटलेल्या होत्या. येथील प्रभारी पोलिस निरीक्षक एस बी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलीस निरीक्षक मनोहर जाधव, मनोज वाघमारे यांच्यासह फॉरेन्सिक टीमचे इद्रीस पठाण, विकास वाघ, हरीश परदेशी यांनी नमुने घेतले आहेत. हा युवक कोण, तो कोठून आला, त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला या प्रश्‍नांची उकल करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

Banana Halwa Recipe: उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग केळं, गूळ अन् ३ पिठांपासून बनवा भन्नाट ‘केळ्याचा हलवा’

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

SCROLL FOR NEXT