Cyber crime esakal
जळगाव

जळगाव : सोशल मीडियावर महाविद्यालयाची बदनामी; सायबर पोलिसांत गुन्हा

जळगाव शहरात नामांकित शैक्षणिक संस्था असून, त्या संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालय चालविले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शिरसोली रोडवरील एका नामांकित महाविद्यालयाच्या युट्यूब चॅनलवर अनोळखी व्यक्तीने अश्लिल भाषेचा वापर करून महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सायबर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

जळगाव शहरात नामांकित शैक्षणिक संस्था असून, त्या संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालय चालविले जात आहे. या महाविद्यालयाचे युट्यूबवर चॅनल आहे. त्यावर महाविद्यालयातील कार्यक्रमांचे व्हिडीओ किंवा शैक्षणिक व्हिडीओ अपलोड केले जातात. ८ ते १५ ऑगस्टदरम्यान महाविद्यालयाच्या युट्यूब चॅनलवर एका कार्यक्रमांसदर्भात व्हिडीओ अपलोड केले होते. अपलोड केलेल्या व्हिडीओला सदाफ शेख या नावाच्या व्यक्तीने अश्लिल भाषेचा वापर करून संस्थेसह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची बदनामी केली.

महिला प्राध्यापक व इतरांच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पठविल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत प्राचार्यांनी सोमवारी (ता. १५) सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून सायबर पोलिसांत सदाम शेखविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत नवं राजकीय समीकरण! छगन भुजबळ दिल्लीला जाणार; पुतण्याला मंत्रिपद मिळणार? मोठा राजकीय डाव

मोफत गणवेश योजना पुन्हा अडचणीत! २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट कसं शिवायचं? कमी निधीमुळे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली

Vladimir Putin: ''एकेकाळी अमेरिकेने मोदींवर निर्बंध आणले होते, मात्र आज...'', पुतिन यांनी करुन दिली भारताच्या ताकदीची जाणीव

Latest Marathi News Update: धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरी अधिग्रहित

Suryakumar Reaction: कॅप्टन्सी पण गेली अन् संघातूनही काढलं, नव्या कर्णधारासह टीम जाहीर होताच काय म्हणाला सूर्या?

SCROLL FOR NEXT