Ration Shop Closed
Ration Shop Closed sakal
जळगाव

Ration Shop License Cancel : अमळनेरला 3 रेशन दुकानांचे परवाने रद्द; रेशन माफियांचे धाबे दणाणले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रेशन दुकानांमध्ये साठ्याची अनियमितता व इतर कारणांमुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तालुक्यातील तीन दुकानांचे परवाने अखेर रद्द केले आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. (District Supply Officer finally cancels licenses of 3 shops jalgaon news)

यात भिलाली, एकलहरे आणि भरवस येथील रेशन दुकानांचा समावेश आहे. या दुकानावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे अमळनेर तालुक्यात रेशन मालाचा गैरव्यवहार सुरू असल्याचा पुरावा असून तालुक्यातील रेशन माफियांचे धाबे दणाणले आहे. तत्कालिन तहसीलदार मिलिंद वाघ आणि गोदाम व्यवस्थापक अनिल पाटील यांच्या काळात या दुकानांच्या चौकशा झाल्या होत्या.

अमळनेर तालुक्यातील एकलहरे, भरवस आणि भिलाली येथील रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप शासकीय नियमनुसार न करता त्याचा साठा करून ठेवला होता. याबाबत तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांना या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

त्यात भिलाली येथील दुकान क्रमांक ८४ येथे ४.६१ क्विंटल गहू व २१.७९ क्विंटल तांदूळ, एकलहरे येथील दुकान क्रमांक ८२ येथे १०.१७ क्विंटल गहू आणि १.८७ क्विंटल तांदूळ, भरवस येथील दुकान क्रमांक ६९ मध्ये १५.८८ क्विंटल गहू आणि ३१.७ क्विंटल तांदूळ जास्तीचा आढळून आला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या दुकानांचा रितसर पंचनामा करण्यात आला. यात दुकानदारांनी साठवून ठेवलेला हा माल त्यांनी लाभार्थ्यांना वाटप न करता त्याचा साठा केल्याचे उघड झाले. याबाबातच अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार या तिन्ही दुकानदारांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जळगाव येथे सुनावणी घेतली. त्यात त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या तिन्ही दुकानांचे परवाने रद्द केल्याचे आदेश काढले आहेत.

"अमळनेर तालुक्यातील रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याने यात मोठा गैरव्यवहार होत असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत तक्रार केल्याने हा गैरव्यवहार उघडकीस आला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीही याची दखल घेऊन थेट कारवाई केली आहे. यात समाविष्ट असलेले अधिकारी व इतरांवर देखील कारवाईसाठी लढा सुरू असेल." -जितेंद्र ठाकूर, तक्रारदार, अमळनेर

"तालुक्यातील संबंधित दुकानांची १० मार्च २०२२ ला चौकशी करण्यात आली होती. यात लाभार्थ्यांच्या याद्या अद्ययावत नसणे, दुकानात भावफलक नसणे, हिशोब रजिस्टर तसेच उचल व शिल्लक साठा यात तफावत आढळल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दुकानांवर कारवाई केली आहे." - अमोल पाटील प्रभारी तहसीलदार, अमळनेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT