jalgaon Crime News
jalgaon Crime News esakal
जळगाव

अबब! कलेक्टर बंगल्या समोरच वाहनावर हल्ला; मद्यधुंद दारुड्यांचा धिंगाणा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सर्वाधिक सुरक्षीत समजला जाणारा व्हीव्हीआयपी परिसर असलेल्या अजिंठा विश्रामगृहासमोरच शनिवारी (ता. १६) रात्री एका वाहनावर चार-पाच दारुड्यांनी हल्ला चढवला. वाहनातील तरुणींसह चालक आणि इतर लोकांना शिवीगाळ करत वाहनाची तोडफोड केली. तब्बल अर्धातास हा तमाशा सुरु असताना कोणीही मदतीला धावून आले नाही. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञातांवर अदखलपात्र गुन्हा नोंदवून बोळवण केली. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांना अँटीरेबीज लसीकरण करण्यासाठी पशुपापा संघटनेतर्फे मोहीम राबवली जात आहे. संघटनेचे स्वयंसेवी कार्यकर्ते शहरातील विविध ठिकाणाहून मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांना अँटीरेबीजची लस टोचून पुन्हा सोडून देतात. जळगावकरांसाठी आणि समाज हितासाठी ही संघटना व तिचे कार्यकर्ते अहोरात्र कुठल्याही अपेक्षेशिवाय कार्य करत आहेत. संघटनेतर्फे शहरात सर्व सेवांनी सज्ज असे चालतेफिरते रुग्णालय वजा प्रयोगशाळा असलेले महागडे वाहन(व्हॅन) मागवण्यात आले आहे.

कुत्र्यांना पकडून साफसफाई केल्यावर त्यांना लसीकरण करण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य आणि तज्ज्ञ या वाहनासोबत असतात. लसीकरणाचे काम करत असताना शहरात सर्वात सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या परिसरातील जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या निवासस्थानाकडून जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निवासस्थानाकडे जात असताना शनिवारच्या रात्री अकरा वाजता ५-६ टवाळखोरांनी हे वाहन थांबवले. काहीएक विचारणा न करता शिवीगाळ दमदाटी करत वाहनावर हल्ला चढवून वाहन फोडण्यात आले. भयभीत झालेल्या तरुणी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिस आलेही त्यांनी तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात नेत अज्ञात संशयितांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT