election  
जळगाव

राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींचा बिगुल वाजणार 

सुधाकर पाटील

भडगाव : भडगाव नगर परिषदेसह राज्यातील इतर नगर परिषदांचा कोरोनामुळे स्थगित झालेला मतदारयादीचा कार्यक्रम मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. १५ फेब्रुवारीला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे, तर १ मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. 

राज्यातील एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १३ नगर परिषदा व ८२ नगरपंचायतींचा मतदारयादीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला. यात जळगाव जिल्ह्यातील भडगाव व वरणगाव नगर परिषदांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील रावेर व फैजपूर नगर परिषदेच्या हद्दवाढ, तर इतर ३३ रिक्त जागांवरील पोटनिवडणुकांसाठी मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या. 

असा असेल कार्यक्रम 
प्रभागनिहाय १५ तारखेला प्रारूप याद्या प्रसिद्ध होतील. २२ फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. १ मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल, तर ८ मार्चला मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 

एप्रिलमध्ये मतदान? 
मतदारयाद्यांचा निवडणूक आयोगाने घोषित केलेला कार्यक्रम पाहता मार्चच्या अंतिम आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा घोषित होतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. कोरोनामुळे भडगाव नगर परिषदेची तब्बल एक वर्ष निवडणूक उशिराने होत आहे. 

उमेदवारांची प्रतीक्षा संपली 
वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करत असलेल्या उमेदवाराची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, कोरोनामुळे हा कार्यक्रम स्थगित केला होता. त्यानंतर ११ महिन्यांनी मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. वर्षभरापासून इच्छुक उमेदवारांची निवडणूक लढविण्याची प्रतीक्षा हा कार्यक्रम घोषित झाल्यामुळे संपली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter : 'ना कनेक्शन, ना वीज वापर'... तरी हजार रुपयांचं बिल; स्मार्ट मीटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्न

Baglan NCP: बागलाणात राष्ट्रवादीचा 'मंगळवार पॅटर्न'; सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिलीप खैरे यांची मोठी घोषणा, कार्यकर्त्यांना दिला नवा मंत्र

Food Adulteration: राज्यातील अन्न व दूधभेसळ प्रकरणांवर कठोर कायदे करा; ग्राहक पंचायतीचे तुकाराम मुंढेंना निवेदन

Pune News: कात्रज तलाव परिसरात दुर्दैवी घटना! कठड्यावरून दरीत कोसळून ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Raigad News: मुसळधार पावसाचा कहर! पालीजवळ धोंडसे गावात मोठी दरड कोसळली; वीज खांब पडल्याने पाणीपुरवठा ठप्प

SCROLL FOR NEXT