exam esakal
जळगाव

Jalgaon Talathi Kotwal Exam : उद्या तलाठी, कोतवाल पदांसाठी परीक्षा; परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Talathi Kotwal Exam : जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी (ता. १३) पोलिसपाटील व कोतवाल रिक्त पदांसाठी जळगाव जिल्ह्यातील आठ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

सकाळी ११ ते दुपारी साडेबारा व दुपारी तीन ते चार या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. (Examination for posts of Talathi Kotwal in district on 13 august jalgaon news)

परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे.

परीक्षा केंद्र परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) चे मनाई आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

केंद्राजवळच्या ५० मीटरच्या आतील परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने पेपर सुरू झालेपासून ते संपेपर्यंत बंद राहातील.

सकाळ सत्रात‌ पोलिसपाटील व दुपार सत्रात कोतवाल या पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रतिबंधात्मक आदेश परीक्षार्थी, नियुक्ती अधिकारी, कर्मचारी, पोलिस, होमगार्ड यांच्यासाठी लागू होणार नाही, असे श्री. सुधळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Results : सतेज पाटलांच्या विजयामुळे धास्ती? 'गोकुळ'च्या निकालाने महायुती बॅकफूटवर? कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

TV पाहण्याची पद्धत बदलणार! सेट-टॉप बॉक्सशिवाय ५०० हून अधिक चॅनेल्स, प्लॅन फक्त १९९ रुपयांपासून, टाटा प्लेची भन्नाट ऑफर

अभिनेता धनुष राजकारणात येणार? कोणत्या पक्षात जाणार, संपत्तीची रंगली चर्चा?

Latest Marathi News Live Update : कथित ऑडिओ क्लिपवर भाजप -शिवसेना आमनेसामने; उदय सामंत काय म्हणाले?, पदवीधरवरही भाष्य

Farmer Relief: पाच हजारांची मदत नको, शेतकऱ्यांना भरीव दिलासा हवा!

SCROLL FOR NEXT