cotton sowing esakal
जळगाव

खरिपाच्या पेरण्या 97 हजार हेक्टरवर पूर्ण

देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात जून महिन्यातही पेरण्या योग्य पाऊस झालेला नाही. आतापर्यंत केवळ ३४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बागायती पेरण्यांमध्ये ९३ हजार ६०० हेक्टरवर कापूस पेरा झाला आहे. ऊस २१ हजार हेक्टर, मका १८ हजार हेक्टवर, अशाप्रकारे आतापर्यंत ९७ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या पूर्ण होण्यासाठी अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे.

जिल्ह्यात १२ नंतर १७ जूनला चांगला पाऊस झाला. तरी तो पेरण्या योग्य नाही. यामुळे शेतकऱ्यांनी अजून पेरण्यांना वेग दिलेला नाही. दमदार पावसानंतर पेरण्या वेग घेतील, असा अंदाज आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागात रविवारी (ता. १९) जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. मात्र, भुसावळसह इतर ठिकाणी पाऊस झाला नाही. रविवारी दिवसभरात केवळ ६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

खरिपाच्या पेरण्या ७ जुलैपर्यंत होतील. तोपर्यंत मान्सूनचे जोरदार आगमन होईल. यामुळे शेतकरी सध्या पेरण्यांची घाई करताना दिसून येत नाही. आताच पेरण्या केल्या आणि पावसाचा खंड पडला, तर पिके पाण्यावाचून जळतील. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येईल. बियाणे, पेरण्यांवर केलेला खर्च वाया जाईल. यामुळे तूर्ततरी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

आतापर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस

तालुका--मिलिमीटर--टक्केवारी

जळगाव--१३--९.६

भुसावळ--३४.८--२८.८

यावल--२४.९--१९.६

रावेर--२९.५--१३.५

मुक्ताईनगर--३३.३--३२

अमळनेर--३८.८--३३

चोपडा--४२.९--३३.६

एरंडोल--३२.१--२६.६

पारोळा--१४.३--११.६

चाळीसगाव--६८.४--५३

जामनेर--४६.७--३३.९

पाचोरा--१६.८--१४.५

भडगाव--४९.१--३८.५

धरणगाव--३५.३--२५.२

बोदवड--१८.८--१५.२

एकूण--३४.३--२७.६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT