fraud alert esakal
जळगाव

Jalgaon : बंगाली कारागिराकडून ‘भंगाळे गोल्ड’ची फसवणूक

रईस शेख

जळगाव : शहरातील भंगाळे गोल्ड या सुवर्ण पेढीसाठी (jewelry shop) दागिने घडवणूक करणाऱ्या बंगाली कारागिराने विश्वास संपादन करून १४ लाख ११ हजार ६४९ रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला. शनीपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. अस्ता तारक रॉय (रा. मातोश्री बिल्डींग, शनीपेठ, मुळ रा. पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. (Fraud of Bhangale Gold jewelry shop by Bengali workers Jalgaon Crime News)

शहरातील पोलनपेठेतील राजकमल टॉकीजसमोर भंगाळे गोल्ड सुवर्ण पेढी आहे. या सराफा शेारुममध्ये अस्ता तारक रॉय हा बंगाली कारागीर दागिने घडवणुकीचे काम करत होता. शोरुम सुरु झाल्यापासून गेल्या चार वर्षांपासून तो कामावर असल्याने भंगाळे गोल्डचे मालक व्यवस्थापकांचा त्याच्यावर बऱ्यापैकी विश्वास बसला होता. याचा गैरफायदा घेत वेळोवेळी २४ कॅरेट सोने वेगवेगळ्या वजनाचे सोन्याचे तुकडे घेऊन जाऊन त्यातील काही सोन्याचे दागिने रॉय याने भंगाळे गोल्ड येथे जमा केले होते. तर, यातील काही दागिने रिपेअरिंग करायचे होते.

त्यापैकी उर्वरित १४ लाख ११ हजार ६४९ रुपये किमतीचे २७३.२६९ ग्रॅमचे वजनाचे सोने घेऊन त्याने पोबारा केला. भंगाळे गोल्ड या संस्थेची व मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी आकाश भागवत भंगाळे यांनी शनीपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अस्ता तारक रॉय याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT