doctor (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : महापालिकेच्या ‘आपला दवाखाना’साठी डॉक्टरांच्या 20 जागासाठी 42 उमेदवार पात्र

Jalgaon : महापालिकेतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या सोळा ‘आपला दवाखाना’ साठी पूर्णवेळ डॉक्टरच्या जागा भरण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या सोळा ‘आपला दवाखाना’ साठी पूर्णवेळ डॉक्टरच्या जागा भरण्यात येत आहे. एकूण वीस जागासाठी तब्बल ४२ उमेदवार पात्र झाले असून त्यांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

महापालिकेच्या आपला दवाखान्यासह इतर दवाखान्यासाठी एमबीबीएस पदवीधारक डॉक्टर आवश्‍यक होते. मात्र ते मिळाले नाहीत. (Jalgaon 42 candidates are eligible for 20 posts of doctors for Aapla Dawakhana)

त्यामुळे शासनाकडून महापालिकेने बीएएमएस डॉक्टरांची पदे भरण्यासाठी मंजुरी मिळविली. त्यानुसार १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात काढण्यात आली होती. त्यात ७७ अर्ज आले. या सर्व अर्जांची छाननी करून ४२ जणांना पात्र ठरविण्यात आले आहेत.

यात एमबीबीएस व बीएएमएसही पदवीधारक आहेत. ३५ जण अपात्र ठरले आहेत.महापालिकेस सतरा आपला दवाखाने मंजूर असून त्यापैकी केवळ एकच दवाखाना सुरू आहे. (Latest Marathi News)

आता सोळा दवाखाने डॉक्टर भरतीनंतर जळगावकरासाठी सुरू होणार आहेत. खुल्या गटात महिलांच्या राखीव तीस जागा असून त्यासाठी एकही अर्ज आलेला नाही. खुल्या गटातील दोन जागांसाठी २२ अर्ज आले झाले आहेत. त्यात १८ जण पात्र झाले आहेत. निवृत्त डॉक्टरांच्या एका जागेसाठीही एकही अर्ज आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

Raigad Protest: पालीत जंतरमंतर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन; विद्यार्थी समर्थनार्थ नागरिकांची मोठी एकजूट

Latest Marathi Update : पेपरफुटीप्रकरणी दोषींना लवकर शिक्षा होणार; फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा, निर्मला सीतारामन यांची माहिती

IND vs ZIM : इतिहास फक्त 16 धावा दूर; पण शून्यावर बाद झाला तर अभिषेकच्या नावावर नकोसा विक्रम

Pune News: हवेलीत धक्कादायक प्रकार! ‘मुळा-मुठा’वरील २४ कोटींचा पूल पहिल्याच पुरात कोसळला; पीएमआरडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह..

SCROLL FOR NEXT