Farmers sowing the cotton crop after three days of rain in the field and sowing in the field. esakal
जळगाव

Jalgaon Kharif Crop Sowing : खरिपाच्या 50 टक्के पेरण्या! रावेर तालुक्यात सर्वत्र पाऊस

Jalgaon News : तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व सौम्य पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

रावेर : तालुक्यात गेले तीन दिवस पाऊस पडत असल्यामुळे खरिपाच्या ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या पावसामुळे येत्या आठवड्यात खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या होतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, तालुक्यातील पाल व परिसरात कमी पाऊस पडला आहे. मात्र तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व सौम्य पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे. (Jalgaon 50 percent sowing of Kharif)

रावेर तालुक्यात खरीप पिकासाठी सुमारे पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र खरीप पिकांसाठी उद्दिष्ठ दिले आहे. मागील आठवड्यापर्यंत १२ हजार २०० हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र तीन दिवसांपासून रात्री सतत पाऊस झाल्यामुळे येत्या आठवड्यात खरिपाच्या पेरण्या शंभर टक्के होतील, अशी अपेक्षा आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बागायती कपाशीची वाढ होत असून, पीक तरारत आहे. तर हळद व केळीलाही फायदा होत आहे. (latest marathi news)

तालुक्यात झालेल्या खरीप पिकाच्या पेरण्या व कंसात उद्दिष्ट असे : कापूस बागायती ९७०९ हेक्टर, जिरायती कापूस ३३२ (१७०४५), मका १३९५ (२१५०), ज्वारी ३०० (२४५०), मूग ३३ (४५०), उडीद ६७ (९८०), तूर १७२ (७५०), सोयाबिन १९२ (७००), भाजीपाला ७९, तसेच हळद, केळीची लागवड ही मोठ्या प्रमाणावर होत आहे. आतापर्यंत झालेली लागवड अशी, हळद ११६३, केळी १२ हजार ३८७,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalu Yadav Family Dispute : रोहिणी नंतर आता आणखी तीन बहि‍णींनी नाते तोडले, लाल प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह थांबेना

Sharad Pawar: सरसकट पैसे वाटण्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करू: शरद पवार : काँग्रेस संपेल असे वाटत नाही, नेमकं काय म्हणाले?

राज्यात गारठा वाढणार! उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट, तर मुंबई-पुणेही गारठलं; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

Capricorn Horoscope 2026: लव्ह लाईफमध्ये चढ-उतार...तर सिंगल व्यक्तींसाठी लग्नाच्या संधी; वाचा तुमचं वार्षिक राशीभविष्य

आजचे राशीभविष्य- 17 नाेव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT