जळगावच्या कथित घटनेची महिला आयोगाकडून दखल Sakal
जळगाव

जळगावच्या कथित घटनेची महिला आयोगाकडून दखल

पोलिस अधीक्षकांची माहिती, आदेशान्वये चौकशी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील अजिंठा विश्रामगृह येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या सोशल मीडियावर आलेल्या कथित घटनेची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून या प्रकरणी आलेल्या पत्रानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहावर शनिवारी रात्री अत्याचार झाल्याचे कथित वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू आहे, याबाबत माहिती देताना जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितले, की सोमवारी (ता. ८) दिवसभर जळगाव शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृहावर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या बातम्या फिरत आहेत.

त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाकडून चौकशी करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार रामानंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. मात्र यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे तसेच कोणतीही तक्रार पीडिता किंवा पीडिताच्या नातेवाइकाकडून प्राप्त नाही. अद्यापही कोणतेही तथ्य या वृत्तातून समोर आलेले नाही. मात्र, राज्य महिला आयोगाच्या पत्राच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातर्फे या प्रकरणाची चौकशी करावी याबाबत निवेदन आम्हास प्राप्त झाले आहे, असेही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT