Fine  esakal
जळगाव

Jalgaon News : भिवंडीतील व्यावसायिकाला 1 कोटी 80 लाखांचा दंड

Jalgaon News : ठाणे जिल्ह्यातील एका व्यावसायिकाला येथील न्यायालयाने दीड कोटी रुपयांच्या धनादेश अनादर प्रकरणी दाखल सहा गुन्ह्यात एक कोटी ८० लाख रुपये दंडाची शिक्षा.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : ठाणे जिल्ह्यातील एका व्यावसायिकाला येथील न्यायालयाने दीड कोटी रुपयांच्या धनादेश अनादर प्रकरणी दाखल सहा गुन्ह्यात एक कोटी ८० लाख रुपये दंडाची शिक्षा, तसेच प्रत्येक गुन्ह्यात दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना कारावास ठोठावण्याचे आदेश शनिवारी (ता. ६) न्यायालयाने दिले. (Jalgaon Bhiwandi businessman fined 1 crore 80 lakhs)

येथील व्यापारी व्यंकटेश चंद्रय्या कलाल यांनी भिवंडी येथील व्यापारी नफिस अहमद खान (रा.सोनाले, ता.भिवंडी, जि. ठाणे) यास प्लास्टिक पाइप तयार करण्याची प्लँटची मशिनरी क्रेडिटवर विक्री केली होती. तसेच काही रक्कम उसनवार देखील दिली होती. या दोन्ही व्यवहारांची दीड कोटी रक्कम नफिस अहमद याच्याकडे घेणे निघत असल्याने त्याने ही रक्कम परत करण्यासाठी कलाल यांना २५ लाख रुपयांचे प्रत्येकी सहा धनादेश दिले होते.

हे सर्व धनादेश अनादरीत झाल्याने व्यंकटेश कलाल यांनी पारोळा येथील विधिज्ञ उज्ज्वल मिसर व ॲड. सिद्धांत मिसर यांच्यामार्फत पारोळा न्यायालयात सहा फौजदारी खटले दाखल केले होते. या खटल्याकामी आरोपी नफिसतर्फे मुंबई येथील ॲड. मनसुख शहा हे काम पाहात होते.

सर्व खटल्यांचे कामकाज पारोळा न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. काझी यांच्या समक्ष चालले. आरोपीविरुद्ध असलेले पुरावे, तसेच न्यायालयात या प्रकरणात साक्षीदारांनी दिलेले साक्षी पुरावे तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय या गोष्टींचा विचार करीत न्यायालयाने सर्व सहा प्रकरणात आरोपीस सिद्ध दोष घोषित केले.

तसेच आरोपीस प्रत्येक गुन्ह्यांसाठी ३० लाख रुपये असे एकूण सहा गुन्ह्यात एक कोटी ८० लाख रुपये दंडाची शिक्षा तसेच प्रत्येक गुन्ह्यास दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना कारावासाची देखील शिक्षेचा आदेश शनिवारी (ता. ६) दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT