Fraud Crime  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon Fraud Crime : सैन्यात नोकरी लावून देतो, असे सांगून घेतलेले दोन लाख रुपये परत दिले नाही व नोकरीही दिली नाही म्हणून तालुक्यातील देवळी येथील एका तरुणाने आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : सैन्यात नोकरी लावून देतो, असे सांगून घेतलेले दोन लाख रुपये परत दिले नाही व नोकरीही दिली नाही म्हणून तालुक्यातील देवळी येथील एका तरुणाने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील तिन्ही प्रशिक्षकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळी (ता. अमळनेर) येथील सागर संजय बैसाणे हा २०२१ मध्ये म्हैसाळ (ता. मिरज, जि. सांगली) येथे मानसी करियर अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होता. (Jalgaon fraud with lure of job)

तेथे असलेले प्रशिक्षक सुशांत सुनील उबाडे (रा. वाळे खिंडी, ता. जत, जि. सांगली), अकादमीचे संस्थापक अनिल भरत कांबळे (रा. कर्मवीर नगर, म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली), महादेव विलास सातपुते (रा. लोणारवाडी, ता. कवठे महाकाळ, जि. सांगली) यांनी ७ एप्रिल २०२२ रोजी सागर याला सैन्य दलाच्या ‘बीआरओ’मध्ये नोकरीला लावण्यासाठी साडेसहा लाख रुपयांची मागणी केली.

त्यावेळी त्यांना एक लाख रुपये देण्यात आले. त्यांनतर अनिल कांबळे याला कॅन्सर झाल्याने अकादमी बंद करण्यात आली. (latest marathi news)

पुन्हा ऑक्टोबर २०२२ मध्ये सुशांत उबाळे याने एक लाख रुपयांची मागणी केली. तिघांनी सागर याला सरकारी नोकरी न देता कॅन्टीनमध्ये मजुरीला लावून दिले. सागर याने दिलेले दोन लाख रुपये परत मागितले असता त्यांनी नकार दिला.

म्हणून वैतागून सागर याने २२ जानेवारीला रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली. या प्रकरणी सागरचे काका सुभाष बैसणे यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT