Fraud Crime  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : भूखंड नावे करून देण्याच्या नावे फसवणूक

Fraud Crime : गौरव पवार या तरुणाची १८ लाखांना फसवणूक झाल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : शहरालगत बखळ प्लॉट नावावर करून देतो, असे सांगून मुक्ताईनगरातील गौरव पवार या तरुणाची १८ लाखांना फसवणूक झाल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यातील संशयितांना जिल्‍हा न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. जळगाव शहरातील मुक्ताईनगरात वास्तव्यास असलेले डॉ. किरण पवार, डॉ. जुही पवार आणि गौरव रवींद्र पवार यांच्या वतीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १२) दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे चंद्रकांत सतीश माहेश्वरी प्लॉटच्या व्यवहारासंदर्भात दिलेली रक्कम व सौदेचिठ्ठीवरून खरेदी करणार गौरव पवार व किरण रवींद्र पवार असे दस्तऐवज असलेले कागदपत्र (स्टॅम्प पेपर) लिहून दिले होते. ( Fraud in favor of plot names )

या संदर्भात चंद्रकांत सतीश माहेश्वरी यांनी १० एप्रिल २०२४ ला त्यांच्यात आणि पवारात झालेला आर्थिक व्यवहार याविषयी पोलिस अधीक्षक व शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सावकारी तसेच मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची शक्यता असल्याचे नमूद केले होते, असे असतानाही डॉ. जुही पवार यांचे भाऊ गौरव पवार यांनी रामानंद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्ह्याची नोंद झाली होती.

दाखल गुन्ह्यासंदर्भात चंद्रकांत माहेश्वरी व सतीश माहेश्वरी यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला हेाता. त्यावर सुनावणी होऊन न्या. जयदीप मोहिते यांच्या न्यायालयाने अंतरिम जामीन हा मंजूर केला आहे.

माहेश्वरी यांना पन्नास हजारांचा बॉन्ड तसेच पुढील तारखेपर्यंत दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ यादरम्यान रामानंद पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष हजेरी लावण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. या प्रकरणात माहेश्वरींच्यावतीने अ‍ॅड. के. बी. वर्मा यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यावर न्यायालयाने चंद्रकांत माहेश्वरी व सतीश माहेश्वरी यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री साडे आठ वाजता संबोधित करणार, काय बोलणार?

Sahil Shaikh Story : बापानं गवंडी काम केलं, तर आईनं शेती! लेकानं जिद्दीच्या जोरावर मिळवली खाकी; वाचा पाचवेळा अपयश पचवलेल्या साहिल शेखची प्रेरणादायी यशोगाथा

SCROLL FOR NEXT