Guardian Minister Gulabrao Patil speaking at the Shiv Sena Shinde group meeting. Officials and activists in front. esakal
जळगाव

Jalgaon Gulabrao Patil : ‘महायुती’च्या शुद्ध पाण्यात कुणीही खडा टाकू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon News : प्रत्येक कार्यकर्त्याच्या मी पाठीशी खंबीरपणे उभा आहे. राज्यात महायुतीचे सरकार जोमाने काम करीत आहे. जिल्ह्यातही ‘महायुती’ एकदिलाने सोबत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : प्रत्येक कार्यकर्त्याच्या मी पाठीशी खंबीरपणे उभा आहे. राज्यात महायुतीचे सरकार जोमाने काम करीत आहे. जिल्ह्यातही ‘महायुती’ एकदिलाने सोबत आहे. आमच्या शुद्ध पाण्यात कुणीही खडा टाकून पाणी दूषित करू नये. पडद्याआड राजकारण करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांपासून सावध राहा, असा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना दिला. येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. (Jalgaon Gulabrao Patil)

जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, युवासेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर काटोले, अजय महाजन, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की निवडणुकांमध्ये युतीसाठी आम्ही नेहमीच शब्द पाळला आहे. शाखाप्रमुख, सरपंचांनी ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ या पद्धतीने मिशन मोडवर राहून काम करावे. मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. (latest marathi news)

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण याचा विचार न करता सूक्ष्म नियोजन करा. संदीप सुरळकर यांनी सूत्रसंचालन केले. युवासेनेचे ज्ञानेश्वर कटोले यांनी आभार मानले.

१०१ पदाधिकाऱ्यांचा नियुक्त्या घोषित

शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेनेच्या तालुकास्तरीय आठ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या. सेवालाल महाराज अंगीकृत संघटनेच्या १६ पदाधिकारी व युवासेनेच्या ७७ पदाधिकाऱ्यांचा नियुक्त्या घोषित करून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT