Love Affair Case esakal
जळगाव

Jalgaon News : मुलाच्या मामामुळे फसला सैराट गेम; अल्पवयीन मुलीसह तरुण पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नशिराबाद शिवारातील मन्यारखेडा येथील अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले होते. पीडितेला घेऊन तरुण मुक्ताईनगर तालुक्यात मामाच्या गावी धडकला. मात्र, मामाला घडला प्रकार पाहून धडकी भरल्याने दोघांची माहिती पोलिसांना देत दोघांना मुक्ताईनगर पोलिसांत हजर करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्यातील पीडितेसह संशयिताला पकडून नशिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले.

मूळ पाचोरा तालुक्यातील पीडिता मन्यारखेडा येथे काकाच्या घरी आली असताना शुक्रवारी (ता. १८) दुपारी अडीचच्या सुमारास अज्ञाताने तिला फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेत पीडितेच्या काकांनी तक्रार दिल्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दाखल गुन्ह्यातील पीडिता आणि तिला पळवून नेणारा तरुण असे दोघेही मुक्ताईनगर तालुक्यात असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील पोलिस नाईक गणेश शिरसाळे, सपना एरगुंटला यांना मिळाली. त्यांनी रीतसर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातून अल्पवयीन तरुणीसह संशयित अमोल संतोष मराठे अशा दोघांना ताब्यात घेत जळगावी आणले. येथे आल्यावर पीडितेच्या अपहरणाचा गुन्हा नशिराबाद येथे दाखल असल्याचे कळाल्यावर दोघांना नशिराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला करीत आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

मामाने सैराट गेम उधळला

अमोल संतोष मराठे याने ममुराबाद शिवारात काकाकडे आलेल्या पीडितेचा पिच्छा पुरवून तिला फूस लावत पळवून नेले. दोघेही अमोलच्या मामाकडे मुक्ताईनगर तालुक्यात आल्यावर मामाने मुलीला बघताच त्याला गंभीर गुन्ह्याची चाहूल लागली. त्याने तत्काळ पोलिसांना कळवून दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केल्याने तरुणाच्या डोक्यात रंगलेले सैराट चित्रपटाचे भूत पोलिस ठाणे बघताच उतरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT