Air Plane (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावहून लवकरच प्रवाशी विमानसेवा सुरू होणार

Jalgaon : लवकरच फ्लाय 91 कंपनीचे विमान जळगाव विमानतळावरून आकाशात झेपावणार आहे.अशी माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएश यांनी फ्लाय नाईन्टी वन (फ्लाय ९१) कंपनीला आजच सर्व परवानग्या पुर्ण झाल्याने डिजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र पत्र देण्यात आले असून लवकरच फ्लाय 91 कंपनीचे विमान जळगाव विमानतळावरून आकाशात झेपावणार आहे.

अशी माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली. (Passenger airline service will start from Jalgaon soon)

खासदार पाटील यांनी सांगितले, पंधरवड्यात डीजीसीए चेअरमन विक्रम दत्त आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन जळगाव येथून पुणे,हैदराबाद व गोवा प्रवाशी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भामध्ये सात्तत्याने पाठपुरावा केला होता.

आज अखेर या सर्व परवानग्याचे प्रमाणपत्र कंपनीला देण्यात आले असून पुन्हा एकदा जळगाव विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे.

विमानतळावरून नाईट लँडिंग ते वैमानिक प्रशिक्षण केंद्र या सुविधातून जळगाव विमानतळ हे देशाच्या विमानतळाच्या यादीमध्ये अग्रस्थानी असणार आहे. आज दीर्घ प्रतिक्षेनंतर फ्लाय 91 एअर लाईनला डिजीसीए कडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6,00,00,00,000 इतकी आहे विजय थलापतीची संपत्ती! 27 वर्षांच्या संसारानंतर बायकोला किती मिळणार पोटगी?

ST Smart Card: प्रगतीचा डिजिटल मार्ग! ‘स्मार्ट कार्ड’साठी आठवडाभरात लाखो प्रवाशांची नोंदणी

Latest Marathi News Live Update : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत वायू गळती, पोलीस तपास सुरु

Iran Missile Production: इराण रोज किती मिसाईल्स बनवतो? अमेरिका, इस्रायला का आहे भीती?

Mumbai: मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार, डालखिचडीमध्ये आढळलं झुरळ; अन्नसुरक्षेचा धक्का!

SCROLL FOR NEXT