Ration shop esakal
जळगाव

Jalgaon News : रेशन दुकानात आता ‘आय स्कॅनर’; रेशन दुकानांत चाचपणी सुरू

Jalgaon : रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉज मशीनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हातांनी लाभार्थ्यांना परत जावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉज मशीनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हातांनी लाभार्थ्यांना परत जावे लागते. मात्र, आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आता ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे. त्यामुळे व्यक्तीचे डोळे स्कॅन करून खात्री केली जाईल व त्या व्यक्तीला धान्य दिले जाणार आहे. जळगाव शहरातील काही दुकानांत प्रायोगिक तत्त्वावर उपयोग केला जात असून, लवकरच राज्यातील सर्वच दुकानांत आय स्कॅनर गन दिली जाणार आहे. (Jalgaon Ration shop will now have eye scanner)

रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी शासनाने ई-पॉज यंत्रणा कार्यान्वित केली. यामध्ये व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांना धान्य दिले जाते. जिल्ह्यातील सर्वच रास्त भाव धानर दुकानात ई-पॉज यंत्र आहे. मात्र, काही जणांच्या बोटांवरील रेषा पुसट होतात. विशेषतः गवंडी काम करणाऱ्या व्यक्ती, धुणीभांडी करणाऱ्या महिला यांना ही समस्या जाणवते.

व्यक्ती, धुणीभांडी करणाऱ्या महिलांना ही समस्या जाणवते. त्यामुळे ई-पॉज यंत्रावर त्यांचे ठसे उमटत नाहीत. मग, त्यांना कुटुंबातील अन्य व्यक्तींना आणून त्यांचे ठेसे देऊन धान्य घ्यावे लागते. संबंधित व्यक्तीला धान्य दुकानदार ओळखत असूनही ई-पॉज यंत्रावरील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना धान्य देता येत नाहीत.

यामुळे नाहक वादाचे प्रसंग उद्‌भवतात. यासाठी आता शासनाने ‘आय स्कॅनर गन’चा पर्याय आणला आहे. यामध्ये प्रत्येक दुकानात आप ‘आय स्कॅनर गन’ दिली जाणार आहे. ज्या व्यक्तीच्या हाताचे ठसे ई-पॉज यंत्रावर येणार नाहीत. त्यांचे डोळे स्कॅन करून त्यांना धान्य देण्यात येणार आहे. यामुळे कोणत्याही व्यक्तीला धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागणार नाही. (latest marathi news)

"ज्येष्ठ नागरिक, मोलमजुरी करणाऱ्या महिला, पुरुष यांच्या बोटांचे ठसे अस्पष्ट होतात. त्यामुळे ते ई-पॉज मशीनवर येत नाहीत. अशा व्यक्तीसाठी आता आय स्कॅनर आणले जाणार आहेत. त्यामुळे कोणीही व्यक्ती धान्य घेण्यापासून वंचित राह‌णार नाही." - नितीन सपके, जिल्हाध्यक्ष, शहर व ग्रामीण रेशन दुकानदार संघटना

आधारचा डेटा येणार उपयोगात

आधार कार्ड काढताना डोळ्यांचे स्कॅनिंग करून ‘आयरीज’ घेतले आहेत. त्यामुळे आय स्कॅन केल्यानंतर आधार नंबरशी त्याची शहानिशा केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा ओळख पटते. त्यामुळे आधार कार्डसाठीचा ‘डाटा’ येथे उपयोगात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT