Senior leader Sharad Pawar while guiding NCP Sharach Chandra Pawar party gathering in the city on Sunday.  esakal
जळगाव

Jalgaon Sharad Pawar : हुकूमशाही वृत्तीला जनताच धडा शिकवेल : शरद पवार

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ गांधी चौकातील भागीरथीबाई वाचनालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.

सकाळ वृत्तसेवा

जामनेर : दहा वर्षांत दिलेले कोणतीही आश्वासन पूर्ण न करता विरोधकांना विचारता तुम्ही काय केले? ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात, अशा हुकूमशाही प्रवृत्तीला या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरच्चंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी जामनेर येथील मेळाव्यात केले. (Jalgaon Sharad Pawar statement People will teach a lesson to dictatorial attitude)

रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ गांधी चौकातील भागीरथीबाई वाचनालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. जळगाव येथून नागपूरला निघालेल्या शेतकरी दिंडीची आठवण पवार यांनी या वेळी काढली. शेतकऱ्यांसाठी स्वाभिमान योजना काढली, पहिल्यांदाच देशातील शेतकऱ्यांना ६५ हजार कोटींची कर्जमाफी दिली. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो व न्याययात्रेचेही पवार यांनी कौतुक केले.

देशात हुकूमशाही राजवट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री सोरेन यांनी टीका केली म्हणून त्यांना कारागृहात टाकले. त्यांनी हुकूमशाही राजवट चालविली आहे. मात्र जनता ही राजवट मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर त्यांनी टीका केली. (Latest Marathi News)

देशात आज महागाई, बेरोजगारी वाढली आहे. उज्ज्वला गॅसबाबत महिलांची फसवणूक केली. आज गॅसचे दरही वाढले आहेत. मोदी राज्यकारभार करण्यात अपयशी ठरले आहेत. माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी पालकमंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, रावेरचे आमदार शिरीष चौधरी.

माजी आमदार संतोष चौधरी, शिवसेनेचे संजय सावंत, एजाज मलिक, रोहिणी खडसे, हिरालाल राठोड, डिगंबर पाटील यांची भाषणे झाली. तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी प्रास्ताविक केले. अर्जुन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश पाटील यांनी आभार मानले.

पवारांच्या भाषणातील मुद्दे व वेळ

एकूण भाषण : ३५ मिनिटे

शेतकऱ्यांविषयी : ४ मिनिटे

केंद्र सरकारवर टीका : ८ मिनिटे

स्थानिक प्रश्‍नांवर : ३ मिनिटे

मोदींवर व्यक्तिगत टीका : ७ मिनिटे

उमेदवाराविषयी : ३ मिनिटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

Viral Video: धावत्या ट्रेनमधील स्टंटवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले धाडस की..! पाहा व्हायरल व्हिडिओ

IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं 'धुरंधर' स्टाईल सेलिब्रेशन अफगाणिस्तान अन् बलुचिस्तानमध्ये? Video होतायेत Viral

SCROLL FOR NEXT