Shahid Sheikh esakal
जळगाव

Jalgaon News: वेल्डिंगचे काम करताना तिसऱ्या माळ्यावरून पडून तरुणाचा मृत्यू! अमळनेर येथील घटना; मिल चाळ परिसरातून हळहळ

Accident News : येथील मिल चाळ परिसरातील रहिवासी असलेला शाहीद सादिक शेख आजारी असल्याने आपल्या घरीच आराम करीत होता. मात्र, कामावर गेलेला त्याचा मोठा भाऊ शाकीरला पाण्याची बाटली देण्यासाठी तो कामाच्या ठिकाणी गेला अन...

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर वेल्डिंगचे काम करी असताना तोल जाऊन खाली कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ११) दुपारी बाराच्या सुमारास येथील आर. के.नगर परिसरात घडली. शाहीद सादिक शेख (वय २४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Jalgaon young man died after falling from third floor)

येथील मिल चाळ परिसरातील रहिवासी असलेला शाहीद सादिक शेख आजारी असल्याने आपल्या घरीच आराम करीत होता. मात्र, कामावर गेलेला त्याचा मोठा भाऊ शाकीरला पाण्याची बाटली देण्यासाठी तो कामाच्या ठिकाणी गेला. मात्र, आपल्या भावाला कामात मदत करण्यासाठी तोदेखील कामाला लागला; परंतु काम करीत असताना काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर शाहीद सादिक शेख याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. दरम्यान, सध्या शाहीद सादिक शेख याच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याची तयारी कुटुंबीयांकडून सुरू होणार होती. मात्र, शाहीदचा असा मृत्यू झाल्याने तो राहत असलेल्या मि चाळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT