vanshika mahajan 
जळगाव

अखेर ती हरली..वंशिकाला वाचविण्यासाठी गाव धावले पण मृत्‍यूने गाठलेच

प्रा. हिरालाल पाटील

कळमसरे (जळगाव) : सर्व सामान्य कुटुंबातील माहेरवासीन अर्चना महाजन हिची मुलगी वंशिकाला अचानक ब्लड कँसरने ग्रासले. घरात अठराविश्व दारिद्र्य त्यात दोन वेळ खायचे वांदे होते. उपचारासाठी कुठे घेऊन जावे या विवंचनेत असताना कळमसरे गावातील तरुणांनी तिला नाशिक येथे उपचारासाठी हलविले. हे सारे प्रयत्‍न वंशिकाला वाचविण्यासाठी होते. परंतु, अखेर तिची झुंज अपुर्ण राहिली आणि कॅन्सरने तिला हरविले.
वंशिका महाजन हिला अचानक ताप आला आणि चक्‍कर आली. तिची तपासणी केली असताना तिला ब्‍लड कॅन्सर झाल्‍याचे निदान समोर आले. मायेची ऊब देत तिला मदतीसाठी अख्खे गाव धावून आल्याने तिच्यावर उपचारही सुरू होते. मात्र आज (ता.17) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिची नाशिक येथे उपचार सुरू असताना प्राणज्योत मावळली. तिच्या मृत्‍यूच्या निरोपाने सारे गाव हळहळले.

मित्रांनी केला मदतनिधी जमा 
काही दिवसांपूर्वी वंशिकाची तब्बेत अचानक बिघडल्याने तिला अमळनेर येथे दाखविले असता तिला ब्लड कँसर असल्याचे कळाले. गावाची माहेरवाशीण असल्याने कळमसरे ग्रामस्थ तिच्या मदतीला लागलीच धावून आले. वंशिकाला वाचविण्यासाठी आणि परिवाराला आर्थिक मदतीसाठी गावात फिरून निधी देखील गोळा करून उपचार सुरू होते.

आई- वडीलांसह गाव रडले
दरम्यान तिच्या उपचारासाठी ‘सकाळ’मधून आवाहन करण्यात आल्याने गावासह बऱ्याच ठिकाणाहून आर्थिक मदत गोळा होत असताना वंशिकाच्या आई वडीलांना कुठेतरी आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु आज अचानक उपचार सुरु असताना तिने अखेरचा श्वास घेतला आणि तिच्या आई- वडिलांनी टाहो फोडला. नाशिक येथे मागील महिन्याभरापासून वंशिकाचे आई वडील तिच्यासोबत दवाखान्यात होते. लहान भाऊ आणि बहीण गावात आजी- आजोबांकडे असल्याने गावात तिच्या मृत्यूचे कळताच ते भेदरल्या सारखे रडत असल्याने उपस्थितांचे काळीज हेलावले होते. गावातील शांत आणि हुशार विद्यार्थिनी गेल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत असून तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीसाठी धावलेले शारदा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकांनी तिच्या घराकडे धाव घेत गर्दी केली होती. वंशिकाच्या पच्यात आई- वडील लहान भाऊ आणि बहीण आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT