no mask use 
जळगाव

दंड भरू पण मास्‍क नाही वापरणार..म्‍हणूनच दोन दिवसात दीड लाखाचा दंड

प्रा. हिरालाल पाटील

कळमसरे (जळगाव)  : सद्यस्थितीत राज्यात सर्वत्र कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्‍यानुसार अंमलबजावणीसाठी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आणि त्यांचे टीमने व नगरपालिका प्रशासनाने शहरात विना मास्क वाल्यांवर कारवाईचा बडगा सुरू केला असून, विनामास्‍क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात असून, दोनच दिवसात दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
 

असा केला दंड वसूल
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दंड आकारणीस सुरवात झाली आहे. केवळ अमळनेर शहरातून दीड लाखाचा दंड वसूल झाला आहे. यात रविवारी (ता.21) अन्नपूर्णा मंगल कार्यालयास 21 हजार दंड आणि 90 जणांवर कारवाई करून 21 हजार 100 दंड असा ऐकवून 42 हजार 100 रूपयांचा दंड पोलीस प्रशासनाने केला. तर नगरपालिका प्रशासनानेही शहरातील वाणी मंगलकार्यालय, बंशीलाल पॅलेस यांच्यावर प्रत्येकी अकरा हजार आणि विनामास्क वाल्यांकडून सहा हजार पाचशे असा एकूण 28 हजार 500 रूपये दंड केला. तर सोमवारी (ता.22) अमळनेर पो.स्टे. हद्दीत सिद्धिविनायक मंगलकार्यालयावर दंड आणि दोन लग्न मिरवणुक कारवाई करून एकूण 53 हजार रुपये दंड करण्यात आला. त्‍याचप्रमाणे एकूण 71 केसेस करून 24 हजार 100 दंड असा एकूण 77 हजार 100 रूपये. असे दोन दिवसात सुमारे दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला.

तरी देखील फिरताय बिनधास्‍त
पोलीस व नगरपालिका प्रशासनाने शहरातील मंगलकार्यालयांवर व विना मास्क वाल्यांकडून दोन दिवसात सुमारे दीड लाख दंड वसूल केला. मात्र यामुळे कोरोना काळात विना मास्क लावून फिरणाऱ्यांना चपराक बसल्याने स्वयंशिस्तीचे पालन व जागरूकता झाल्याने दिवसभर आज चर्चा होती. तरी काही जण अगदी बिनधास्‍तपणे फिरताना दिसून येत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT