changdev muktai 
जळगाव

चांगदेव मुक्ताईचा परिसर सुना सुना; यात्रोत्सव प्रथमच खंडित

संदीप शिंपी

चांगदेव (जळगाव) : अनेक वर्षांच्या रूढी परंपरेनुसार संत चांगदेव मुक्ताईचा यात्रोत्सव हा बारा महिन्यांतील एक वारकरी संप्रदायाचा मोठा उत्सव मानला जातो. परंतु कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संत चांगदेव मुक्ताईचा महाशिवरात्री पर्वावर भरणारा यात्रोत्सव यंदा रद्द करण्यात आला. मात्र, नियम पाळून शिवलिंगाच्या महारुद्राभिषेकाची परंपरा कायम ठेवली आहे. 
दर वर्षी माघ महिन्यातील महाशिवरात्रीला संत चांगदेवांचा भरणारा यात्रोत्सव रद्द झाला; परंतु अनेक वर्षांच्या रूढी, परंपरेनुसार गुरुवारी (ता. ११) सकाळी पहाटे पाचला संत चांगदेव मंदिरात प्रतिनिधिक स्वरूपात मुक्ताईनगरचे तहसीलदार श्वेता संचेती यांच्या हस्ते आणि अंकुश चौधरी, मिलिंद डवले (मलकापूर) यांच्यासह दोन जोडप्यांना सौ. अंजली व सोपन गुरव, तसेच सौ. भाग्यश्री व किशोर भोई या दांपत्यांसह संत चांगदेवांची महापूजा केली. विशेष म्हणजे, तहसीलदार श्वेता संचेती यांच्या हस्ते चांगदेव महाराज मंदिरातील शिवलिंगाचा महारुद्राभिषेक करण्यात आला. 
या यात्रोत्सवानिमित्त दर वर्षी लाखो भाविकांचा मळा फुलतो. यंदा मात्र मंदिर परिसर निर्मनुष्य दिसत आहे. ना टाळ, मृदंगाचा आवाज, ना हरिनामाचा गजर, ना दिंड्या, महोत्सव यामुळे सर्व सुनेसुने वाटत आहे. अनेक वर्षांच्या कालखंडापासून चालत आलेला हा यात्रोत्सव महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रोत्सवापैकी एक होय. परंतु कोरोना महामारीमुळे पहिल्यांदाच रद्द करण्याची वेळ आल्याचे ज्येष्ठ वारकरी आणि गावकरी सांगतात. 

मंदिरात दर्शन नाही 
चार दिवस भाविकांना संत चांगदेव व मुक्ताईचे दर्शन नाही. संत चांगदेव व मुक्ताई व्यवस्थापनाला जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनानुसार ९ ते १२ मार्चपर्यंत असे चार दिवस मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, फक्त पाचच मानाच्या दिंड्यांना मंदिरात महाशिवरात्री पर्वावर परवानगी मिळाली. यात संत मुक्ताई संस्थान कोथळी, ज्ञानेश्वर माऊली ठोंबे अलमपूर, विठ्ठल हरी महाराज धुपेश्वर, जगन्नाथ महाराज अंजाळा व सदगुरू मुकुंद महाराज येनगावकर या दिंड्यांनी चांगदेव महाराज मंदिरात हजेरी लावली. 

पोलिसांकडून नाकाबंदी 
चांगदेव मंदिराकडे भाविक भक्तांनी येऊ नये म्हणून पोलिस प्रशासनातर्फे प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील डीवायएसपी विवेक लावंड, अतिरिक्त गटविकास अधिकारी आर. एल. जैन, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश सोळुंके यांच्यासह चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच चांगदेवचे सरपंच निखिल बोदडे, उपसरपंच दत्तू चौधरी, ग्रामविकास अधिकारी चौधरी व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि अतुल पाटील, पंकज कोळी, ग्रामपंचायत कर्मचारी मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी तळ ठोकून होते. 

आम्ही दर वर्षी यात्रोत्सवाला दिंडी घेऊन येतो. परंतु या वर्षी आम्ही घरीच चांगदेव, मुक्ताईच्या प्रतिमेचे पूजन केले. ही बाब आमच्या आयुष्यात प्रथमच घडून आली. 
- पुरुषोत्तम महाराज, वारकरी, जि. बुलढाणा 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT