survived mother 
जळगाव

चिमुकली होती म्‍हणून वाचले आई अन्‌ लहान बहिणीचे प्राण..घडला प्रकार भयानक

राजेश सोनवणे

जळगाव : शहरातील कोल्हेनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेने गरम पाण्यासाठी लावलेले हिटर बटन बंद न करताच बादलीत हात घातला. यात विजेचा जोरदार धक्का बसला. परंतु पाच वर्षाच्या मुलीने प्रसंगावधानाने लहान बहिणीला दूर नेत हिटरचे बटन बंद करून आई व बहिणीचे प्राण वाचविले. 

कोल्‍हेनगर परिसरात काळे परिवार वास्‍तव्यास आहे. एमआयडीसीतील एका कंपनीत अधिकारी पदावर प्रसाद काळे कार्यरत आहे. कोल्हेनगरात ते पत्नी गुलबक्षी (वय ३३), मुलगी शिवांगी (वय ५) आणि इशान्वी (वय २) यांच्यासह वास्तव्याला आहे. प्रसाद काळे हे सकाळी नऊला ड्यूटीवर गेल्यावर घरी पत्नी आणि दोन्ही मुली होते. 

गरम पाण्यासाठी लावले हिटर
दोघा मुलींची आंघोळ घालायची म्‍हणून गुलबक्षी यांनी स्टीलच्या बादलीत हिटर लावले. पाणी गरम झाले; परंतु मुलींनी अंघोळ करण्यास नकार देत बाहेर खेळण्यासाठी गेल्या. दोन्ही मुली बाहेर गेल्याने केव्हाही घरात येऊ शकतात धोका नको; म्हणून त्यांनी बटन बंद करून पाणी थंड केले. त्यानंतर गुलबाक्षी यांनी स्वत:च्या आंघोळीसाठी पाणी गरम केले. परंतु पाणी घेतांना हिटरचे बटन बंद न करता बादलीत हात टाकला असता त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. 

आवाज ऐकून मुली आल्‍या आणि..
विद्युत शॉक लागल्‍याने त्या फेकल्‍या गेल्‍या. याचा आवाज झाल्याने बाहेर खेळत असलेल्या दोन्ही मुली घरात धावत आल्या. आईचा चेहरा पाहून आई आपल्‍याशी गंमत करत असावी असे म्‍हणून लहान मुलीने आईजवळ हसत धाव घेतली. परंतु मोठी मुलगी शिवांगी हिने प्रसंगावधान राखत बहिणीला आईपासून लांब करत प्लॅस्टीक स्टूलवर उभे राहून हिटरचे बटन बंद केले. थोडा उशीर झाल असता तर कदाचित आई गुलबाक्षी व बहिण इशान्वी यांच्या बाबतीत दुर्घटना घडली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT