gas cylinder fire 
जळगाव

मुलाची केक कापण्याची तयारी; इतक्‍यात सिलेंडरचा भडका

चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : शहरातील श्रीरामनगरातील दत्तनगर भागातील रहिवाशी गणेश मिस्त्री यांच्या मुलाचा रात्री वाढदिवस साजरा करत असतांना घरात गॅस सिलेंडरने भडका घेतल्याने परिसरात धावपळ झाली. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात असलेल्‍या दत्तनगर भागातील घरमालक नितीन इंगळे यांच्या घरात भाडेकरू म्‍हणून गणेश मिस्त्री राहतात. त्‍यांच्या मुलाचा सहावा वाढदिवस असल्‍याचे साजरा करण्याची तयारी सुरू होती. बाजारात केक देखील आणला होता. सर्व तयारी झाल्‍यानंतर केक कापण्याची तयारी सुरू झाली असतानाच सदर घटना घडली.

त्‍यांनी पेटता सिलेंडर काढला बाहेर
वाढदिवस रात्री साजरा करीत असतांना रात्री पवणेदहाच्या सुमारास घराच्या किचनमधील गॅस सिलेंडरने अचानक भडका घेतला. किचनमधून काहीतरी आवाज आला म्‍हणून गणेश मिस्‍त्री आतमध्ये पाहण्यास गेले असता त्‍यांना सिलेंडर पेटत असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यांनी जीवाची पर्वा न करता, पेट घेतलेले गॅस सिलेंडर घेऊन घराबाहेर फेकले. घटनेची आरडाओरड होताच दत्तनगर मंडळातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटलेले गॅस सिलेंडर विझविले. यामध्ये कुठलेही नुकसान झालेले नसून गणेश मिस्त्री कोरकोळ जखमी झाल्याची माहिती परीसरतील नागरिकांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

वडिलांच्या जागी नोकरी, अनेक अडचणी, तरीही सुरक्षिततेसाठी नऊ वर्षांची जिद्द; वाचा रुळांवरची धाडसी ‘सिग्नल वुमन’ची गोष्ट

Womens Day: युपीत ट्रेनच्या ड्रायव्हरपासून तिकीट कलेक्टरपर्यंत सगळीकडे 'नारी शक्ती'चा डंका; रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय!

Pune Weather: पुणेकरांना उकाड्याचा तडाखा; कमाल ३७ अंश सेल्सिअस, पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार

SCROLL FOR NEXT