Chalisgaon River Flood 
जळगाव

चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस..पाचव्यांदा पूर,संपर्क तुटला

Chalisgaon Flood News :पाटणा गाव आणि परिसरात पाऊस सुरूच असल्याने नदीपात्रात अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे.

आनंन शिंपी

चाळीसगाव : शहरासह तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्याने तालुक्यातील नदी-नाले फुलवून ओसंडून वाहत आहेत. शहरातून वाहणाऱ्या तितुर व डोंगरी नदीला पूर (River Flood) आला असून पुराचे पाणी शहराच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या पुलांवरून वाहत असल्याने दोन्ही बाजूचा संपर्क तुटला आहे.

शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील पाटणादेवी, शिवापुर, मोठा महादेव, कन्हेरगड, परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पाटणा गाव आणि परिसरात पाऊस सुरूच असल्याने नदीपात्रात अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीलगतच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

गिरणा धरण परिसरातही चांगला पाऊस होत असल्याने धरणाचा जलसाठा ७८ टक्के झाला आहे. तालुक्यातील मन्याड धरण परिसरात ७५ मिमी पावसाची नोंद झाली असून सध्या या धरणातून पाच हजार क्युसेसचा विसर्ग सुरु आहे. तर जामदा (ता. चाळीसगाव) बंधा-यातून १५ हजार क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील १४ पैकी १२ मध्यम जलप्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. बोरखेडा व देवळी - भोरस मध्यम प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. चाळीसगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षात प्रथमच विक्रमी पर्जन्यमान होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna Sugar Factory Karad : कराडच्या कृष्णा साखर कारखान्याचे गाळप बंद?; राजू शेट्टी कारखानास्थळी दाखल, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त

Market Crash: अमेरिकेपासून दक्षिण कोरियापर्यंत बाजार कोसळले! भारतात सेन्सेक्स-निफ्टीची तुफान तेजी; गुंतवणूकदारांचा पैसा कुठे वळला?

IND vs NZ ODI Squad: शुभमन, गौतम, प्रग्यान यांच्यात हैदराबादमध्ये मिटींग; वन डे संघाच्या घोषणेची वेळ ठरली; मोहम्मद शमीबाबत...

Latest Marathi News Update : कराड येथील कृष्णा साखर कारखान्याचे गाळप बंद, माजी खासदार राजू शेट्टी कारखानास्थळी दाखल

Mumbai News: मुंबईच्या पाणीप्रश्नावर पालिकेला विहिरींची आठवण, विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची योजना

SCROLL FOR NEXT