जळगाव

आनंदवनातून चाळिसगावकरांना मिळणार शुध्द ऑक्सिजन; सात हेक्टर क्षेत्रावर प्रकल्प !

आनंद शिंपी


चाळीसगाव : शहरापासून जवळच असलेल्या एमआयडीसी परिसरातील बिलाखेड (ता. चाळीसगाव) शिवारात शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागातफे स्वर्गीय उत्तमराव पाटील आनंदवन घनवृक्ष रोपवन प्रकल्प साकारला जात आहे. सुमारे सात हेक्टर क्षेत्रावर साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे चाळीसगावकरांना एक प्रकारे शुद्ध ऑक्सिजनच उपलब्ध होणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या भव्य वनोद्यानाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 

खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाने उद्यानाच्या कामाला गती दिल्याचे दिसून येत आहे./हे उद्यान साकारल्यानंतर नागरिकांचे ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती वनक्षेत्रपाल संजय साळुंखे यांनी दिली. येथील पर्यावरणप्रेमी श्रीकांत भामरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून ही माहिती अपलोड केल्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. 

असे असेल वनोद्यान 
या वनोद्यानात लहान मुलांसाठी बालोद्यान, जॉगिंग ट्रॅक, उद्यानातून फिरण्यासाठी पाऊलवाटा, लहान मुलांसाठी खेळणी, कारंजे, झाडांभोवती ओटे आदी सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केल्या जाणार आहेत. उद्यानात लहान मुलांसाठी घसरगुंडी, झुले, फिरते चक्र, खुली व्यायामशाळा, बसण्यासाठी बाके, वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती तसेच रोपवाटिका राहणार आहे. एक बाय एक फूट मध्य तीन रोपे लावली आहेत. देशी तीस हजार झाडे बहरताहेत. दाट झाडे लावल्याने वाढ झपाट्याने झाली आहे. त्यामुळे येथे पक्षी, फुलपाखरांची संख्या वाढत आहे. प्राण्यांचे पुतळे व त्यांचा आयुष्य, वर्गवारी, प्रजनन, इतर परिपूर्ण माहितीचे फलक असणार आहेत. वन उद्यानात 'शुद्ध ऑक्सिजन पातळी' खूप असल्याने फिरण्यासाठी हे उद्यान आकर्षण ठरणार आहे. याठिकाणी शंभर बाय शंभर फुटाचा तलाव करणार आहेत. स्थानिक स्वरूपाची विविध झाडेही लावण्यात येणार असून. लोकांना झाडांची माहिती व्हावी. यासाठी प्रत्येक वृक्षाची माहिती दर्शविणारे फलक लावले जाणार आहेत. 

पर्यावरणाचा समतोल साधणार
स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखणे आणि नागरिकांच्या मनोरंजनाबरोबरचे शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या उद्देशाने उद्यान विकसित करीत आहेत. येथे देशी आणि औषधी झाडांच्या वृक्षारोपणावर भर देणार आहे. हे उद्यान पर्यटक, अभ्यासकांसाठी मोलाचे ठरेल. तीस प्रकारच्या जातींची झाडे लावली आहेत. अन् वनस्पती औषधीची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय या उद्यानात जंगलात आढळणारी झाडे आहेत. 


या वनउद्यानाद्वारा भूमिपुत्रांना उपयोग नसलेल्या एमआयडीसी परिसरात प्रदूषित हवा स्वच्छ करण्यासाठी झाड महत्वाचे ठरणार आहे. येथे पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे.

अ. वि. नातूंचे होते स्वप्न
चाळीसगावच्या पर्यावरण मंदिराचा कळस चढवलेले, महावीरचक्राने सन्मानित मेजर जनरल अनंत विश्वनाथ नातू यांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होणार आहे. पुढच्या पिढय़ांसाठी एक सुरक्षित पर्यावरण राखले जावे, यासाठी स्वर्गीय नातू यांची तळमळ असायची, अशी माहिती श्रीकांत भामरे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT