जळगाव

खतांसाठी पावसात शेतकऱ्यांची झुंबड..आमदारांनी स्वतः बनवल्या पावत्या ! 

आनंद शिंपी

चाळीसगाव : तालुक्यातील निवडक कृषी केंद्रांवर बुधवारी (ता.२२) यूरिया उपलब्ध झाल्याचे कळताच शेतकऱ्यांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यात अनेक कृषी केंद्रांवर यूरिया पोचला नसल्याने ती बंद होती. तर घाट रोडवरील सुयोग कृषी केंद्रावर अक्षरश: झुंबड उडाली.

फिजिकल डिस्टन्सिंचा फज्जा उडवत रस्त्यावर रांगा लागल्या होत्या. या प्रकाराची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी भरपावसात तत्काळ सुयोग कृषी केंद्र गाठत शेतकऱ्यांना धीर दिला. आमदार मंगेश चव्हाण यांनी कृषी केंद्र संचालकांना बोलावत दुकान उघडण्याच्या सूचना दिल्या व शेतकऱ्यांच्या पावत्या तयार करून त्यांना यूरिया देण्याच्या सूचना दिल्या. 


आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना लॉकडाउनच्या काळात यूरियाच्या दोन गोण्यांसाठी पावसात जीव मुठीत घेऊन उभे राहावे लागत आहे. पाच वर्षांत कधीही शेतकऱ्यांना खतांची अडचण आली नाही. ही बाब मी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार असून, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, येत्या काळात शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खते व यूरिया उपलब्ध न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. भाजप तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, भाजयूमोचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, चेतन पाटील आदी उपस्थित होते. 

आमदारांनी स्वतः बनवल्या पावत्या 
पावसात उपाशीपोटी उभ्या असणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा पाहून आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत स्वतः सुयोग कृषी केंद्राच्या काउंटरवर बसून यूरिया बिलाच्या पावत्या बनवायला सुरवात केली. आमदारांनी घेतलेला पुढाकार पाहून कृषी केंद्राच्या संचालकांनी अतिरिक्त यंत्रणा लावत रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना बिले देण्यास सुरवात केली. शेतकऱ्यांनी झालेल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, आमदार चव्हाण यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सांगून व्यथित झालेल्या शेतकऱ्यांना चहा व बिस्किटांचे वाटप केले.  

संपादन- भूषण श्रीखंडे

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT