जळगाव

आदिवासी गावांमध्ये वनसंवर्धनातून रोजगारनिर्मितीसाठी लवकरच आराखडा तयार होणार 

देविदास वाणी

जळगाव ः यावल अभयारण्य क्षेत्रातील गावे, चोपडा परिसरातील आदिवासी गावांमध्ये वनसंवर्धन व त्यातून रोजगारनिर्मितीवर भर द्यावयाचा आहे. ज्यातून या गावांमध्ये लोकांची उपजीविका व जीवनमान उंचावता येईल. यासाठी असा कृती आराखडा तयार करा की सर्व विभागांच्या योजना येथे राबविता येतील व नागरिकांचे जीवनमान उंचावता येईल, यासाठीचा कृती आराखडा लवकरच तयार करून सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केल्या आहे. 

जिल्ह्यातील सामुदायिक वनाधिकार प्राप्त गावांमधील वनव्यवस्थापन व संवर्धन कृती आराखडे तयार करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक वनहक्क जिल्हा कन्व्हर्जन समितीची आढावा बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपवनसंरक्षक होशिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते आदी अधिकाऱ्यांसह लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, लोकसमन्वय प्रतिष्ठानचे संजय महाजन उपस्थित होते. 

वनहक्क कायदा-२००८ नुसार सामूहिक वनहक्क प्रदान करण्यात आलेल्या गावांमध्ये मिळालेल्या सामूहिक वनक्षेत्राचे व्यवस्थापन व संवर्धन करण्यासाठी त्यांचे कृती आराखडे तयार करण्यासाठी लोकसमन्वय प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील निवडलेल्या १८ गावांमध्ये गावसमित्या तयार करून कृती आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबतीत अध्यक्षा शिंदे यांनी मांडणी केली. 


यावेळी यावल अभयारण्य क्षेत्रातील गावे, चोपडा परिसरातील आदिवासी गावांमध्ये वनसंवर्धन व त्यातून रोजगारनिर्मितीवर भर द्यावा लागेल. ज्यातून या गावांमध्ये लोकांची उपजीविका व जीवनमान उंचावता येईल म्हणून या कृती आराखड्यात सर्व विभागांच्या योजनांचा समन्वय करून विकासकामे करता येतील. स्थानिक नैसर्गिक संसाधनांचे रक्षण व संवर्धनही होईल, असे सांगत सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला प्रकाश बारेला, ताराचंद पावरा, इरफान तडवी उपस्थित होते. 

ही प्रक्रिया लोकांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने शासकीय यंत्रणेने आपापल्या विभागांच्या योजनांच्या समन्वयातून या भागात नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवून चांगल्या पद्धतीने योजना राबवूया. त्यासाठी पुढील बैठकीत सर्व विभाग आणि गाव व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Nepal Dispute: बालेन शाहांवर दबाव वाढला, तरीही शांत; पण नेपाळ सरकारने सीमा वाद मिटवण्यासाठी उचललं पाऊल

'Vaibhav Sooryavanshi ला खेळवावे की नाही, यापेक्षा...' सचिन तेंडुलकर १५ वर्षीय बॉस बेबीला कसोटीत खेळण्याबाबत नेमकं काय म्हणाला?

Kharghar Disabled girl : संतापजनक! नवी मुंबईत 17 वर्षीय दिव्यांग मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; पीडिता चार महिन्यांची राहिली गर्भवती

CJPचा संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार, आई-वडिलांना चिंता, घर सोडून अज्ञातस्थळी

French Open 2026: शेवटच्या सेटमध्ये ६-० ने उडाला धुव्वा! फ्रेंच ओपनमध्ये सर्वात मोठा उलटफेर, अव्वल मानांकित सबलेंकाची धक्कादायक हार!

SCROLL FOR NEXT