Rain 
जळगाव

Alert: जळगाव जिल्ह्यात शनिवार, रविवारी वादळाची शक्यता

जळगाव जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे.

देविदास वाणी


जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी येत्या शनिवारी (ता.१६) व रविवारी (ता.१७) वादळी वाऱ्यासह (Storm) अवकाळी पाऊस (Untimely Rain) होण्याची शक्यता हवामान (Meteorological Department) खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी (Farmer), नागरिकांनी (citizens) सतर्क राहणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी करावी व शेतात साठवणूक केलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन वरील कालावधीत होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण करणे सोयीचे होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले.

आधीच अतिवृष्टीने शेतकरी हवालदील

जळगाव जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिक काळवडली तसेच शेतात पाणी साचले, नदी, नाल्याला आलेल्या पुरात काठावरील शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तवल्याने शेतऱ्यांनी आपल्या पिकांची व शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

सर्व धरणे ओव्हर फ्लो..

जळगाव जिल्हात ३ मोठे धरणे तर १३ लहान धरणे असून यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच धरणे ओसंडून वाहत आहे. सर्व धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने शनिवारी, रविवारी परतिचा पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पून्हा जोरात पाऊस झाल्यास जळगाव जिल्ह्यातील नद्यांना पुर येवून मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख! पंढरपूर तालुक्यातील ‘या’ ७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कर्जमुक्तीचे सातबारा, पंढरपूर बाजार समितीत कृषी महोत्सव

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT