road accident road accident
जळगाव

मामा- भाची सोबत जात असताना अपघात; मामाचा जागीच मृत्‍यू

मामा- भाची सोबत जात असताना अपघात; मामाचा जागीच मृत्‍यू

सकाळ डिजिटल टीम

यावल (जळगाव) : तालुक्यातील भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर मोटरसायकल व ट्रक अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला. सदर घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली.

बोरावल येथून आज (ता.२२) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दगडू रामदास शिंदे हे (वय ५०, रा.आव्हाणे ता. जि. जळगाव) हे बोरावलकडून भुसावळ येथे मोटारसायकल (क्र. एम.एच. १९ डीएच २१७४) ने भाची मनिषा ईश्वर सोनवणे (वय १८) हिस सोबत घेऊन जात होते. रस्‍त्‍यावर वाघळूद फाट्याजवळ भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या ट्रक (क्र. जीजे २७ टीटी ४३७८) या ट्रकने धडक दिली. यात धडकेत दगडू शिंदे हे फेकले गेले. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर सोबत असलेली त्यांची भाची मनिषा सोनवणे ही गंभीर जखमी झाली आहे.

दोघांच्या मदतीने भाचीला जीवदान

अंजाळे येथील राहणारे धनराज शांताराम सपकाळे व सागर निवृती तायडे यांनी घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरूणीला तत्काळ मदत करून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिचे यावल ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करण्यात येवून तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT