Eid-e-Milad 
जळगाव

रावेरमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याची 'ईद'ला पून्हा उमटली मोहर

त्याची परतफेड आज ईदच्या दिवशी हिंदू बांधवांनी करीत त्याच पावलावर पुढे पाऊल टाकत जातीय सलोख्याचे वातावरण अधिकच दृढ केले.

सकाळ वृत्तसेवा

रावेर : आज ईद-ए-मिलादच्या (Eid-e-Milad) पार्श्वभूमीवर येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौक मित्रमंडळाने मुस्लिम समाजातील मौलाना, पंच मंडळ आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी ही केली. गणेशोत्सवात (Ganeshotsav) सुरू झालेल्या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या या नव्या अध्यायावर आज पुन्हा विश्वासार्हतेची मोहर उमटली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बारीवाडा, मन्यारवाडा,कारागीर चौक हा सर्व परिसर संवेदनशील आहे. गेल्या तीस-चाळीस वर्षात या भागात जातीय दंगली होऊन दोन्ही समाज घटकातील निष्पाप युवकांना आणि कुटुंबांना त्याचे चटके सहन करावे लागले आहेत.या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रार्थनास्थळासमोरून जाणाऱ्या गणेश मूर्तींवर आणि भक्तांवर प्रार्थनास्थळातून पुष्पवृष्टी केली, कार्यकर्त्यांचा सत्कार केला व सामाजिक सलोख्याचे पहिले पाऊल टाकले. दुर्गा उत्सव काळातही मानाच्या सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील व पदाधिकाऱ्यांचा मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी व पंच कमिटीने सत्कार केला. त्याची परतफेड आज ईदच्या दिवशी हिंदू बांधवांनी करीत त्याच पावलावर पुढे पाऊल टाकत जातीय सलोख्याचे वातावरण अधिकच दृढ केले.

अँड एल के शिंदे, राजेश शिंदे, प्रशांत दाणी यांनी या कामी पुढाकार घेतला.आज ईदच्या सकाळच्या नमाजनंतर प्रभारी विभागीय पोलीस अधिकारी विवेक लवांड, नगराध्यक्ष दारा मोहम्मद जाफर मोहम्मद, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाजाचे मौलाना हाफिज अख्तर नूरी, पंच नूर अहमद मोहम्मद हसन, गुलाम शेख, मोहम्मद रफी, शेख इलियास तसेच शेख मुस्ताक, शेख अब्दुल्ला, शेख मोहम्मद यांचा शाल, गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. जिथे दंगलीत दगड, विटा आणि फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचा खच पडत असे तिथे फुले उधळली गेली. या भागातील हिंदू - मुस्लिम बांधवांच्या बदललेल्या मानसिकतेचेच हे प्रतीक होते. या प्रसंगाचे साक्षीदार होते माजी उपनगराध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेवक आसिफ मोहम्मद, ॲड सुरज चौधरी, राजेंद्र महाजन, ज्ञानेश्वर महाजन, दिलीप कांबळे, बाळू शिरतुरे, गोपाल बिरपन, राहूल अस्वार, पोलिस उपनिरीक्षक शीतल कुमार नाईक,गोपनीय विभागाचे पुरुषोत्तम चौधरी,राजेंद्र करोडपती, यांच्यासह शेकडो हिंदू - मुस्लिम बांधव. सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT