Death 
जळगाव

जळगावः पिकांचे नुकसान पाहून शेतकरीपुत्राचा सुटला धीर

एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या जाण्याने आई, वडिलांसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा


निंभोरा बुद्रुक (ता. रावेर) : येथील गितेश विकास ढाके (वय १८) हा शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास घरातून न सांगता निघून गेला. दसरा (Dussehra) दिवस असल्यामुळे आई वडिलांना वाटले की मित्रांना भेटायला गेला असेल. परंतु सायंकाळपर्यंत घरी न आल्याने आई, वडिलांनी व परिवारातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केली. यानंतर सोमवारी चौथ्या दिवशी सुकी नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह (Death) तरंगताना आढळून आला होता.

याबाबत पोलिसांनी आई, वडिलांकडून खात्री केली असता तो मृतदेह बेपत्ता झालेला गितेश ढाकेचा असल्याची खात्री झाली. मृतदेह पाहताच कुटुंबियांनी आक्रोश केला. गितेश हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या जाण्याने आई, वडिलांसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

पिकांचे नुकसान पाहून सुटला धिर

यंदाही पावसाने खरीप हंगाम पाण्यात गेला आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे समजून हताश झालेल्या गितेशने माझे शेतकरी वडील माझा शिक्षणाचा खर्च पेलवणार नाही, असे चित्र डोळ्यासमोर दिसत असल्याने आत्महत्या केली असावी. पिकांचे नुकसान पाहून त्याचा धीर सुटला होता. यानंतर त्याने सुकी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली, असे समजले. याबाबत निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कोल्हे, गणेश सूर्यवंशी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT