hiralala barela family
hiralala barela family sakal
जळगाव

जन्मतः दोन्ही पायाने अधू..काम करणारे हातही गेले; पत्‍नी कडेवर घेवून जाते तेव्हा..

राजू कवडीवाले

यावल (जळगाव) : लहानपणापासून दोघं पायांनी अपंग असलेल्या युवकाचे चार महिन्यांपूर्वी ट्रॅक्टरच्या कडबा- कुट्टी कटर मशिनमध्ये दोघ हात जाऊन पूर्णतः अपंगत्व आले. यामुळे रोजगार बुडालेल्या हिरालाल बारेला (Handicapped hiralal barela no more work) या आदिवासी तरुणाच्या नशिबी एका डोळ्याने आंधळी व दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू असलेली पत्नी, लहान तीन मुले असा संसाराचा गाडा ओढणाऱ्या युवकाची नियतीने एवढी मोठी क्रूर थट्टा केली. (yawal-barela-family-help-society-handicp-husband-and-wife)

काम करणारे हातही हिरावले

महर्षी व्यास मंदिराजवळ एका झोपडीत राहणारे आदिवासी पावरा कुटुंब सध्या शिवाजीनगर परिसरात चर्चेत आहे. मूळ मध्य प्रदेशातील शिरवेल महादेव (Shirvel shiv temple madhya pradesh) परिसरातील हिरालाल बुदला बारेला (वय ३३) दोघं पायाने अपंग होता. बारेला हे व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात यावल येथे पाच वर्षापासून पत्नी इंद्राबाईसह वास्तव्यास आहेत. दरम्यान चार महिन्यांपूर्वी एका ट्रॅक्टरच्या कडबा- कुट्टी कटर मशिनवर काम करीत असतांना अचानकपणे दोघं हात कटरमध्ये जाऊन कापले गेले. परिणामी त्यांचे दोघं हात कायमचे गेले. पायाने अपंग असतानाही इंद्राबाईसोबत संसाराचा गाडा ते एकटे ओढत असतांना नियतीने दोघे हातही त्यांच्याकडून हिरावून घेतले. त्यामुळे हिरालाल यांचा होता नव्हता तोही रोजगार बुडाला.

ती पतीसाठी झाली सर्वस्‍व

पत्नी इंद्राबाई आंधळी असल्यामुळे दोघांपुढे जीवन कसे जगावे हा यक्षप्रश्न उभा राहीला. मग घरी बसल्या मिळेल ते खावे याशिवाय त्यांचेकडे पर्याय नव्हता. त्यातच हिरालालकडे मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड नसल्यामुळे शासकीय योजनांचा कोणताही लाभ त्यांचेपर्यंत पोहचलेला नाही. हिरालाल यास हात व पायाने अपंगत्व आल्यामुळे त्यांची पत्नी इंद्राबाई पतीची माता बनून त्यांचे जेवण जेऊ घालणे, पाणी देणे, चहा देणे सर्वच कामे इंद्राबाई करतात.

मग पतीला कडेवर घेवून निघते पत्‍नी

वेळप्रसंगी त्यांची दोन ते सहा वर्षाची तीघं मुलं त्यांचा सांभाळ करीत आहेत. त्यांना काय हवं नको ते बघतात. वेळप्रसंगी हिरालाल यांना गावात काही महत्वाचे काम निघाल्यास पत्नी इंद्राबाई त्यांना कडेवर घेऊन निघते. हिरालाल पूर्णपणे निरक्षर असल्यामुळे त्यांना शासकीय योजनांविषयी काहीही माहिती नाही. त्यामुळे मिळेल त्या मदतीवर त्यांचा संसाराचा गाडा सुरु आहे.

परिवाराला मदतीचा हात

हलाखीचे जीवन जगणाऱ्या इंद्राबाई व हिरालाल बारेला यांचे विषयी सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र शिंदे यांस कळाल्यावर त्याने माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्या कानावर हा विषय टाकला. यानंतर श्री. पाटील यांनी मराठा एकता फाउंडेशनच्या माध्यमातून हिरालाल यांस अपंग सायकल मिळवून दिली. शिवाय अतुल पाटील मित्र परिवाराने त्या दाम्पत्यास दोन हजार रुपये रोख, ३० किलो धान्य, हिरालाल यांस ड्रेस, तर इंद्राबाईस साडी चोळी देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून दाम्पत्यास रोख रकमेसह धान्य मदतीचा ओघ सुरु झाला. नगरसेवक अतुल पाटील यांनी हिरालाल यांस शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी रेशनकार्ड, आधार कार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. अपंग सायकल व मदत देण्याचा एक छोटेखानी कार्यक्रमादरम्‍यान नगरसेवक अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले, उपनगराध्यक्षपती गिरीष महाजन, नरेंद्र शिंदे, नगरसेवक समीर मोमीन, अॅड. देवकांत पाटील,हितेंद्र गजरे, अॅड. जी.एम. बारी, गणेश महाजन, हाजी मो. फारूख ,नथू शिंदे, एजाज देशमुख आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Chandu Champion : 'चॅम्पियन आ रहा है'...कार्तिकच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज; लूकची होतेय चर्चा

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT