thieves 
जळगाव

दागिन्यांचे दूकान फोडण्याचा प्रयत्न फसला..गाडी सोडून चोर फरार

सकाळी जैन हे दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा दुकानाला लावलेल्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप व आसारी कापलेली दिसली

सकाळ डिजिटल टीम


वाकोद (ता. जामनेर) ः येथील बाजारपट्टा भागात असलेले शंकर डोंगरमल जैन यांच्या सोन्याचांदीचे (Gold Shop) दालन असलेले दुकान आहे. या ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी (thieves) चार चाकी वाहनातून येवून दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू गावकऱ्यांची चाहूल लागली असावी म्हणून चोरी न करता चोरांनी तेथून पळ काढला. त्यात मात्र चोरीसाठी आणलेली चारचाकी वाहन चोरांनी इथेच सोडून पळाले.


सकाळी जैन हे दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा दुकानाला लावलेल्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप व आसारी कापलेली दिसली व बाहेर लावलेल्या CCTV कॅमेरा यांच्या वायर तोडल्याचे दिसुन आल्याने त्यांना हा प्रकार दिसून आला तत्पूर्वी अज्ञात वाहनांची व चोरीच्या प्रयत्नांची माहिती पहुर पोलिसांना काळविल्या नंतर पोलीस घटनास्थळी आली व संपुर्ण घटनेची माहिती घेतली.

thieves car

पोलीस घटनास्थळी

घटना स्थळी पोलिस पाटील संतोष देठे ग्रामपंचायत सदस्य विलास जोशी गजानन जोशी यांनी भेट देऊन सदर घटना पहुर पोलिसांना कळवली. गाडी क्र mh 20 bn 3826 ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली पुढील तपास पहुर पोलीस स्टेशन ए पी आय नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भरतजी लिंगायत करत आहे.

चोरी करण्याचे हत्यारे गाडीत

दुकान फोडतांना नागरिकांना चाहूल लागल्याच्या संशय चोराला आला. आणि पकडले जाऊ नये यासाठी चोरट्यांनी पळ काढला. पळ काढतांना आणलेली गाडी तिथेच सोडून चोरटे पसार झाले. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता गाडीत टॉमी, हातोडा व करवत सारखे तत्सम वस्तु सापडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आला छोटा डॉन

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT