जळगाव

चुंचाळे फाट्यानजीक भीषण अपघात;  जळगावचा इसम जागीच ठार

लतिफ तडवी

साकळी ता.यावल :  यावल-चोपडा अंकलेश्वर महामार्गावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुकाची-मालट्रक मध्ये भिषण अपघात झाला. या अपघातात मयत मुकेश सोनार (वय 55 ) असे या इसमाचे नाव असून तो मेहरूण (जळगाव) येथील रहिवासी आहे. सदरील दुर्दैवी घटना सोमवारी घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शी कडून समजलेली माहिती अशी की, आज दि.31 रोजी सकाळच्या दरम्यान साकळी या गावातील मालट्रक ही जळगाव येथे माल आणण्यास जात असतांना चुंचाळे फाट्या नजिक 407 ट्रक व दुचाकीमध्ये जोरदार धडक झाल्याची घटना घडलेली असून या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव मुकेश सोनार(वय 55 )असून ते मेहरूण जळगाव येथील रहिवासी आहे . तर जखमी व्यक्ती रुपेश सोनार(वय 35 ) हेही मेहरूण जळगाव येथील आहेत.


सदर अपघातातील दुचाकी क्रं. एमएच-19-सीक्यू-2989 जळगावहून यावलकडे येत होती. तर माल वाहतूक 407 ट्रक क्रं.- एमएच 19-4100 व दुचाकीची अपघात झाला आहे. यामध्ये मुकेश सोनार हे जागीच ठार झाले असून रुपेश सोनार हे जखमी झाले आहेत. तसेच जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच यावल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीस तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली.अशी माहिती साकळीतील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.

दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील वळणावर क्रृझर गाडीचा अपघात झाला होता. यामध्ये सहा जण जखमी झाले होते. तर गाडीचे खूप मोठे नुकसान झाले होते. सदरील रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी सावधान राहण्याची गरज आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT