Girish Mahajan News esakal
जळगाव

Girish Mahajan: बोदवड सिंचन योजनेच्या कामाला गती : मंत्री महाजन

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan: बोदवड परिसर सिंचन योजना कृषी सहाय्य योजनेंतर्गत पूर्ण करण्यात येत आहे. (Minister Mahajan statement Speed ​​up work of Bodwad Irrigation Scheme jalgaon news )

तालुक्यातील थेट पाइपलाइनद्वारे शेतीला पाणी हा प्रकल्पही युद्धपातळीवर हाती घेण्यात आला असून, त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येणार आणि संपूर्ण तालुका सुजलाम् सुफलाम् होऊन बळीराजा सुखी झाल्याचे पाहायला मिळणार असल्याचा विश्र्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

‘आपला संकल्प-विकसित भारत’ या व्हर्च्युअल कार्यक्रमानिमित्त पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. त्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री महाजन बोलत होते. नऊ-साडेनऊ वर्षांमध्ये राज्यासह देशातील सर्वच क्षेत्रांत चौफेर विकासाच्या नवनवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

नगराध्यक्षा साधना महाजन, ॲड. शिवाजी सोनार, जगन्नाथ चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, बाजार समितीचे सभापती राजमल भागवत, पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, तहसीलदार नानासाहेब आगळे, डॉ. प्रशांत भोंडे, रमेश नाईक, प्रा. शरद पाटील, श्रीराम महाजन, सुहास पाटील, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, महेंद्र बाविस्कर, गोविंद अग्रवाल, तुळशीराम निकम, रवींद्र झाल्टे, स्वीय सहायक दीपक तायडे, ज्ञानेश्वर शिंदे, सदाशिव माळी आदी पदाधिकारी, महिला, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: श्रेयस अय्यरने मागे पळत जात भारी कॅच घेतला, पण लगेचच मैदानातून जावं लागलं बाहेर; नेमकं काय घडंल? पाहा Video

Jaykumar Gore : '...तर पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी मिळणार'; मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं 'हे' खास कारण

Kolhapur Crime : गोव्याला फिरायला गेले अन् बंद बंगला फोडून साडेतेरा तोळे दागिने पळविले, श्वान घराच्या भोवतीच घुटमळलं अन्

Nanded Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध, हात-पाय बांधून नांदेडच्या तरुणाला बेदम मारहाण; अंगाला गरम चटके देऊन केला छळ

CSIR UGC NET December 2025: सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

SCROLL FOR NEXT