Omicron infected both healed month ago jalgaon sakal
जळगाव

जळगाव : ओमिक्रॉनबाधित दोघेही महिनाभरापूर्वीच बरे

सध्याचा संसर्ग अल्फा, डेल्टा, ओमिक्रॉनचे संमिश्र स्वरूप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ओमिक्रॉनचा संसर्ग प्रचंड वाढेल, अशी शक्यता असताना सध्या बाधितांमध्ये आढळून येणारा कोरोना व्हायरस ओमिक्रॉन नसून तो अल्फा, डेल्टा व ओमिक्रॉनचे संमिश्र स्वरूप असल्याचा दावा केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे दोनच रुग्ण समोर आले असून ते महिनाभरापूर्वी बरेही झाले आहेत.

देशात व राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली. डिसेंबरअखेर दहाच्या आत सक्रिय रुग्णसंख्या होती, ती जानेवारीत वाढून साडे तीन हजारांवर पोचली. जळगाव जिल्ह्यात वाढू लागलेल्या संख्येने मोठा आकडा गाठेपर्यंतच दैनंदिन रुग्णसंख्येला आता ‘ब्रेक’ लागला असून स्थिती नियंत्रणात आली. या लाटेत ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढून जानेवारी अखेर पंधरा हजारांवर सक्रिय रुग्ण होतील, असा अंदाज होता. मात्र, वेळेच्या आतच ही तीव्रता कमी झाली.

ओमिक्रॉनचे दोन रुग्ण बरे

गेल्या डिसेंबरमध्येच ओमिक्रॉनचे रुग्ण समोर येत होते. त्यामुळे त्यावेळी आढळून येणाऱ्या बाधितांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात येत होते. त्यानुसार डिसेंबरमध्ये दोन ओमिक्रॉन बाधित समोर आले, ते त्याच आठवड्यात बरेही झाले. संबंधित रुग्ण ओमिक्रॉन बाधित असल्याचा अहवाल ते बरे झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्राप्त झाला. सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा अंश नसल्याचे मानले जात आहे.

संसर्ग संमिश्र व्हेरिएंटचा

सध्या जळगाव जिल्ह्यात आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांचे सर्वच नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात येत नसले तरी ठरावीक नमुने पाठविण्यात येत आहे. त्यात ओमिक्रॉनचा संसर्ग नसल्याचे समोर येत आहे. मात्र, सध्याच्या रुग्णांमध्ये आढळून येणारा संसर्ग अल्फा, डेल्टा व ओमिक्रॉनचे संमिश्र स्वरूप असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. चिकित्सालयीन पद्धतीने केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या संमिश्र व्हेरिएंटचा संसर्ग गंभीर स्वरूपाचा नसल्याचेही मानले जात आहे.

‘डेल्टा’चा धोका कायम

सध्याच्या बाधितांमध्ये अगदीच सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत. ९५ टक्के रुग्णांमध्ये तर लक्षणेही दिसून येत नाहीत. हा व्हेरिएंट उर्ध्व श्‍वसनसंस्थेवर (upper respiratory system) आघात करतो. या उलट दुसऱ्या लाटेत सर्वाधिक जीवितहानी करणारा ‘डेल्टा’ व्हेरिएंट खालच्या श्‍वसनयंत्रणेवर (lower respiratory system) अर्थात, थेट फुफ्फुसात आघात केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे ‘डेल्टा’पासून धोका कायम आहे.

सध्या बाधितांमध्ये संमिश्र स्वरुपाच्या व्हेरिएंटचा संसर्ग दिसून येत असला तरी ‘डेल्टा’ अद्याप कायम आहे. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, दम्याच्या रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दोन-तीन दिवस सलग ताप असेल तर तातडीने चाचणी करून घेतली पाहिजे.

- डॉ. किशोर इंगोले,विभागप्रमुख, जीएमसी प्रयोगशाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT