Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana esakal
जळगाव

ABHA Phule Jan Arogya Yojana : 5 लाखांचे ‘विमा कवच’ कागदावरच! सुधारीत आदेश नसल्याने केवळ दीड लाखांचा लाभ

सकाळ वृत्तसेवा

ABHA Phule Jan Arogya Yojana : ‘आयुष्यमान भारत’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य’ योजना एकत्रित करून पाच लाख रुपयांपर्यंत शस्त्रक्रियांसह उपचार मोफत करण्यात येतील, असा अध्यादेश राज्य शासनाने जुलैमध्ये काढला.

त्यास आता दीड-पावणे दोन महिन्यांचा कालावधी लोटला, तरी योजना कशी राबवायची याच्या मार्गदर्शक सूचना अद्यापही रुग्णालयांना न दिल्याने पाच लाखांचे विमा कवच कागदावरच असल्याची स्थिती आहे.

यामुळे गोरगरीब रुग्णांची हेळसांड होत असून शस्त्रक्रियेस विलंब होत आहे. (phule jan arogya yojana abha health card beneficiaries getting only 1 and half lakh benefit jalgaon news)

सर्व रेशनकार्डधारकांना योजना लागू करून विमा पाच लाखांचा करणार, असा अध्यादेश २८ जुलैस राज्य सरकारने काढला. मात्र, अद्यापही पाच लाखांचे विमा कवच लागू झालेले नाही. त्यासाठीची नियमावलीही नाही अन्‌ सूचनाही नाहीत. त्यामुळे ही योजना फक्त कागदावरच राहिली आहे.

सॉफ्टवेअरमध्ये नोंद नाही

या योजनेत समाविष्ट रुग्णालयांच्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये पाच लाख रुपये विमा योजनेची नोंद झालेली नाही. यावरून नव्या लाभार्थ्यांची नोंदणी, पाच लाखांचे विमा कवच लागू करण्यासाठीची पूर्व तयारी आरोग्य विभागाने केली नसल्याचे दिसून येते.

निविदा काढून योजनेमध्ये बदल करण्यात येतील. त्यानंतर पाच लाखांचे कवच लागू होईल. हे कवच लागू होण्यासाठी किमान दोन ते चार महिने थांबावे लागणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असा आहे विस्तार

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील विमा संरक्षण दीड लाखावरून पाच लाख रूपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रुग्णांना आता पाच लाखांपर्यंतचे उपचार घेता येणार आहेत. या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा समावेश असणार आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ अडीच लाखांहून चार लाखांपर्यंत करण्यात आले आहेत. ९९६ हून अधिक आजारांवर मोफत उपचार होणार आहेत.

"माझ्या भावाच्या जिभेची शस्त्रक्रिया करावयाची होती. त्यासाठी मोठा खर्च लागणार आहे. शासनाच्या नवीन एकत्रीत योजनेतून पाच लाखापर्यंतची मदत या शस्त्रकियेसाठी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अध्यादेश निघाला असला, तरी योजनेची अंमलबजावणी अद्याप सुरू करण्याचे आदेश नाहीत. हा खर्च कसा करावा असा प्रश्‍न आहे." -वैशाली किशोर पाटील, रुग्णाचे नातेवाइक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : उत्तराखंडमध्ये घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT