Aditya Thackeray esakal
जळगाव

Aditya Thackeray Jalgaon Daura : आदित्य ठाकरे उद्या जिल्हा दौऱ्यावर; 4 सभा घेणार

शिवसेना नेते आदित्य ठाकरे बुधवारी (ता.१४) जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवसेना नेते आदित्य ठाकरे बुधवारी (ता.१४) जिल्हा दौऱ्यावर येत आहे. जळगावात सुभाष चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे. तसेच त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

वेळेअभावी बैठक न झाल्यास जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात ते चार सभा घेणार आहेत. (Shiv Sena leader Aaditya Thackeray is coming on jalgaon district tour news)

लोकसभा निवडणुकीनिमित्ताने आदित्य ठाकरे राज्यात दौरा करीत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढविण्यात येणार आहेत.

त्यातील जळगाव लोकसभेची जागा लढविण्याची इच्छा शिवसेना ठाकरे गटातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. त्या दृष्टीनेही त्यांची तयारी सुरू आहे.

जळगाव जिल्हा दौऱ्यात आदित्य ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही बैठक होण्याची शक्यता आहे. परंतु ही बैठक झाली नाही तर महाविकासचे जे नेते भेट घेतील त्यांच्याशी चर्चा होणार आहे.

त्या शिवाय त्यांची जळगावातील सुभाष चौक येथे दुपारी बारा वाजता सभा होणार आहेत. त्यानंतर शिरसोली येथे दुपारी दोन वाजता, कासोदा येथे दुपारी चार वाजता तर भडगाव येथे सायकांळी सहा वाजता सभा होणार आहेत.

शहरातील व जिल्ह्यातील सभेसाठी शिवसेना जिल्हा व शहर प्रमुख शरद तायडे, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आदी तयारीला लागले आहेत. जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा हा दौरा यशस्वी करण्यात येणार आहे.

"आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या जिल्ह्यातील चारही सभा मोठ्या उपस्थितीत पार पडतील." - विष्णू भंगाळे, जिल्हा प्रमुख, शिवसेना, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT