Aditya Thackeray  esakal
जळगाव

Jalgaon News : शिवसेना नेते आदित्य ठाकरे लवकरच घेणार मतदार संघात सभा

जळगाव लोकसभा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता वाढल्याने पक्षाने तयारी सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव लोकसभा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता वाढल्याने पक्षाने तयारी सुरू केली आहे. पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे पुढील आठवड्यात लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर येत असून जळगाव ग्रामीण व पाचोरा आदी ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत.

लोकसभेचे पडघम आता वाजू लागले आहेत. राजकीय पक्ष आता तयारी लागले आहे. महायुती व महाविकास आघाडीचे घटकपक्षही मतदार संघात उमेदवारासाठी जमीन तयार करीत आहे. (Shiv Sena leader Aaditya Thackeray will soon hold meeting in constituency jalgaon news)

आघाडीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गट व कॉंग्रेस असे तीन्ही पक्षांनी जागा वाटपाचे गणित मांडायला सुरुवात केली आहे.

त्यात काही जागांची निश्चिती झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या वेळी जळगाव व रावेर लोकसभा असे दोन मतदार महाविकास आघाडीत दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढविल्या होत्या.

यावेळी मात्र जळगाव लोकसभा मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी ठाकरे गटातर्फे ही जागा लढविण्याचे जाहीर केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा कायम असला तरी अजून जागा वाटप निश्‍चित नाही. मात्र आता राष्ट्रवादी रावेर लोकसभेची जागा लढवून ही जागा शिवसेना उबाठा गटाला मिळण्याची शक्यता आहे.

आयात उमेदवार

शिवसेना ठाकरे गटाकडून जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील तसेच शिवसेना येथील पक्षाचे जिल्हाप्रमुख पारोळा येथील हर्षल माने यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र पक्षातर्फे ही लोकसभा खात्रीने जिंकण्यासाठी उमेदवार आयात होण्याचीही शक्यता आहे.

ही जागा पक्षाला निश्‍चीत होईल त्यावेळी पक्षात जिल्ह्यातील माजी खासदार आयात त्यांना उमेदवारी देवून भाजपला टक्कर देण्याच्या दृष्टीने पक्षाने तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे जिल्हा दौऱ्यावर

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे पुढील आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहेत. जळगाव लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहरात जाहीर सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले.

बुधवार (ता.१४) किंवा गुरुवार (ता.१५) जळगाव, कासोदा, पाचोरा,धरणगाव येथे त्यांची जाहीर सभेसाठी जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT